शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नपुंसकत्वाच्या अफवेने पालकांचा गोवर-रुबेला लसीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:42 IST

लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्वाचा धोका असल्याने मुलांना लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे.

ठळक मुद्देलसीकरण मुलांना आजारातून मुक्त करण्यासाठी लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे.

औरंगाबाद : गोवर, रुबेला लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्वाचा धोका असल्याने मुलांना लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे. या अफवेमुळे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी गणेश कॉलनीतील मनपाच्या उर्दू शाळेत काही पालकांनी लसीकरणाला विरोध केला. मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर काही पालकांनी होकार दिला. मात्र, काही पालक लसीकरण न करण्याच्या मुद्यावर ठाम राहिले.

जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील प्रत्येक मुला-मुलींना गोवर, रुबेला लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. गेली दोन महिने लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागाने विविध माध्यमांतून जनजागृती केली; परंतु अद्यापही काही प्रमाणात पालकांमध्ये गैरसमज असल्याचा प्रत्यय लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी आला. शहरातील गणेश कॉलनी येथील मनपाच्या उर्दू शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार होते; परंतु काही पालकांनी मुलांना लसीकरण करण्यास विरोध केला. ही बाब कळताच मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली. लसीकरणाला विरोध करण्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा पालकांनी सांगितलेले कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला.

लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्व येईल, अशी अफवा एका व्हिडिओद्वारे पसविण्यात येत आहे. या व्हिडिओमुळेच पालकांनी विरोध केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी डॉ. सय्यद मुजीब यांनी पालकांची समजूत काढली. लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यात आले. तसेच व्हिडिओतील बाबी चुकीच्या असल्याचे सांगितले. त्यामुळे लसीकरणाला काही पालकांनी होकार दिला. शाळेतील ४९ पैकी २० विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले. उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण आगामी दिवसांत होईल, असे मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

३९ शाळांमध्ये ५ हजार विद्यार्थ्यांना लसीकरणशहरातील ३९ शाळांमध्ये ५ हजार ५९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तसेच ओपीडीत ६३४ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

लसीकरण मुलांना आजारातून मुक्त करण्यासाठीगणेश कॉलनी येथील मनपाच्या शाळेत गोवर-रुबेला लस देण्यास पालकांनी विरोध केला होता. लसीकरणातून नपुंसकत्व येईल, अशी अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे; परंतु ही अफवा असल्याचे पालकांना समजावून सांगण्यात आले. लसीकरण हे मुलांना आजारातून मुक्त करण्यासाठी आणि समाजातून हे आजार कायमस्वरूपी नाहीसे करण्यासाठी आहे. ही सर्व बाब सांगण्यात आल्यानंतर लसीकरणास होकार देण्यात आला. काही मुलांचे लसीकरण बाकी आहे. तेही होईल.-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्यdoctorडॉक्टरSchoolशाळा