शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

विभागीय क्रीडा संकुलात सुधारणेला अजूनही वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:46 AM

विभागीय क्रीडा संकुलात सुधारणा व्हावी यासाठी येथील क्रीडा अधिकारी कसून प्रयत्न करीत असले तरी अद्यापही सुधारणेला वाव असल्याचे मत मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी याआधीही विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली होती.

ठळक मुद्देक्रीडा उपसंचालक सुधीर मोरे : अनेक कामे न झाल्याने अद्याप पूर्ण समाधानी नाही

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलात सुधारणा व्हावी यासाठी येथील क्रीडा अधिकारी कसून प्रयत्न करीत असले तरी अद्यापही सुधारणेला वाव असल्याचे मत मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी याआधीही विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली होती. त्या वेळेस त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या; परंतु त्यापैकी काही कामे झाली आहेत. तथापि, काही काम न झाल्यामुळे आपण पूर्णपणे समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करण्यास आपण बजावले होते; परंतु तसे झाले नाही. इलेक्ट्रिकविषयीचे कामही तसेच बाकी आहे, तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या वसतिगृहात सुधारणा होणे आवश्यक आहे. तिची रंगरंगोटी व्हावी, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने व आरोग्यदायी वातावरण राहावे यादृष्टीने विभागीय क्रीडा संकुल समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. विभागीय क्रीडा संकुलात तीन बोअर आहेत. त्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास मुख्य मैदानाला पाणी देणे शक्य होईल, तसेच पिण्याअयोग्य पाण्याचाही मैदानावर पाणी टाकण्यास उपयोग करता येईल, असे ते म्हणाले.सिंथेटिक ट्रॅक, अ‍ॅस्ट्रो टर्फसाठी पाठपुरावाविभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक आणि अ‍ॅस्ट्रो टर्फसाठी राज्य शासनातर्फे पाठपुरावा सुरू आहे. या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यताही मिळाली आहे, तसेच सिंथेटिक ट्रॅकला ६ कोटी व हॉकी अ‍ॅस्ट्रो टर्फला ५.५ कोटी रुपयांचा निधीही मान्य झाला असून, या विषयाची फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहितीही सुधीर मोरे यांनी दिली. त्याचप्रमाणे सूतगिरणीच्या दोन एकर जागेवर स्विमिंगपूल उभारण्याचे विभागीय क्रीडा संकुल समितीचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.शासनातर्फे मैदानाच्या देखरेखीसाठी मिळणार नाही आर्थिक साह्यराज्य क्रीडा विभागातर्फे विभागीय क्रीडा संकुलाला सुरुवातीच्या ३ वर्षांपर्यंत देखरेखीसाठी आर्थिक साह्य केले जाते. त्यानंतर मात्र हा खर्च त्यांना मिळणाºया उत्पन्नातून करावा लागतो, अशी माहितीही त्यांनी दिली.तत्पूर्वी, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या मुले आणि मुलींच्या वसतिगृहाला भेट देताना अनेक सूचना केल्या.सुधीर मोरे यांनी मुले व मुलींच्या क्रीडा प्रबोधिनीच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मुख्य सूचना केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, सुनील वानखेडे उपस्थित होते.