शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी महत्वाचे; विद्यापीठातील डीएनए बारकोडिंग प्रयोगशाळेत होणार कर्करोगाचे निदान

By राम शिनगारे | Updated: January 5, 2024 13:50 IST

मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने चार कोटींचे दिले यंत्रे

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 'पॉल हेबर्ट सेंटर फाॅर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायर्व्हसिटी स्टडीज' संस्थेच्या प्रयोगशाळेत आता माफक दरात गुणसूत्रांचे पृथकरण, जनुकीय विश्लेषण आणि कर्करोगाचे निदान होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तब्बल चार कोटी रुपयांची यंत्रसामुग्री कमलनयन बजाज हॉस्पिटलशी संबंधित मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिली आहे. या यंत्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.

विद्यापीठातील डीएनए बारकोडिंग प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. बायोडायर्व्हसिटीच्या संबंधित वेगवेगळ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातच कोरोनाच्या काळात याच संस्थेत कोविड टेस्टिंग लॅब सुरू केली होती. त्याचा मोठा फायदा मराठवाड्याला संकटकाळी झाला. आता मराठवाड्यातून गुणसूत्रांचे पृथकरण, जनुकीय विश्लेषण आणि कर्करोगांचे निदान करण्यासाठी सॅम्पल घेऊन पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी ठिकाणी तपासणीसाठी पाठवावे लागते. त्यासाठी पैसेही अधिक खर्च होतात आणि वेटिंगही करावी लागते. हा विचार करून कमलनयन बजाज हॉस्पिटलशी संबंधित संस्थेने कर्करोगासह इतर प्रकारच्या तपासण्या करण्यासाठीची सायटोजॅनॅटीक प्रयोगशाळा शहरातच सुरू व्हावी, यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावानुसार मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेने विद्यापीठाला चार कोटी रुपयांची यंत्रे सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिली आहे.

ही यंत्रे नुकतीच तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, बजाजचे सी. पी. त्रिपाठी, डॉ. एस. फर्नांडीस, अनिल भंडारे, डॉ. भालचंद्र वायकर, अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे, डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर, डॉ. निवेदिता दत्ता आदींच्या उपस्थितीत सुपूर्द केली आहेत. त्याशिवाय फक्त यंत्रेच दिली नाहीत तर कार्यान्वित करण्यासाठी बजाज हॉस्पिटलकडून मदतही केली जाणार आहे.

तपासण्यासाठी हे यंत्र मिळालेबजाजकडून फ्लो सायटोमीटर, डीएनए सिक्वेन्सर, इमेज ॲनालिसिस सिस्टम ही प्रमुख यंत्रे मिळाली असून, त्यासाठी आवश्यक छोटी-मोठी यंत्रेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सर्वांची किंमत चार कोटी रुपये एवढी असल्याची माहिती संचालक डॉ. खेडकर यांनी दिली.

कोविड लॅबमध्ये ६ लाख ८२ हजार तपासण्याडीएनए बारकोडिंग संस्थेच्या प्रयोगशाळेत उभारलेल्या कोविड टेस्टिंग लॅबमध्ये आजपर्यंत तब्बल ६ लाख ८२ हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे संस्थेचे विद्यापीठ प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाने कोविड टेस्टिंग लॅबसाठी ३५ लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार कोराेनाचा प्रदुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यास कोविड लॅब जनतेच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे.

सायटोजॅनॅटकी प्रयोगशाळा उभी राहणारमराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटकडून उपलब्ध झालेल्या यंत्रांमुळे बायोमेडिकल रिसर्च होण्यासाठी सायटोजॅनॅटकी प्रयोगशाळाच उभी राहणार आहे. या यंत्रसामुग्रीमुळे बायोमेडिकल रिसर्च व रुग्णालयांना माफक दरात गुणसूत्रांचे पृथकरण, जनुकीय विश्लेषण आणि कर्करोगांचे निदान इत्यादी सेवा देता येऊ शकतील.- डॉ. गुलाब खेडकर, संचालक, डीएनए बारकोडिंग संस्था, विद्यापीठ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादcancerकर्करोगHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद