शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

पशुपालकांसाठी महत्वाचे, जनावरांनाही होतो कॅन्सर; लक्षणे ठाऊक आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:30 IST

मानवाप्रमाणे गायी, म्हशी, बैलांनाही कर्करोगाचा सामना करावा लागत असल्याचे पशुशल्यचिकित्सकांच्या निदर्शनास येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मानवाप्रमाणे जनावरांनाही कर्करोग होत असल्याचे पशुचिकित्सकांच्या पाहणीत दिसून आले आहे. विशेषत: जनावरांना शिंगाचा आणि डोळ्याचा कर्करोग होत असल्याचे दिसून आले. यामुळे पशुधनमालकांनी जनावरांना कर्करोग होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन उपायुक्तांनी दिला आहे.

जनावरांनाही होतो कर्करोगदिवसेंदिवस कर्करोगाचे रुग्ण वाढतच असल्याने कर्करुग्णालयांची संख्याही वाढत आहे. मानवाप्रमाणे गायी, म्हशी, बैलांनाही कर्करोगाचा सामना करावा लागत असल्याचे पशुशल्यचिकित्सकांच्या निदर्शनास येत आहे. वेळीच उपचार केल्यास हा कर्करोग बरा होऊ शकतो. परंतु पशुंसाठी क्ष-किरणोपचार, किमोथेरपीसारखे उपचार देणारे सुपरस्पेशालिटी पशुचिकित्सालय आपल्याकडे नाही.

दोन प्रमुख प्रकारगाई, म्हशी, बैलांना डोळे आणि शिंगाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या या प्रकारचाच कॅन्सर जनावरांना होत असल्याचे पशुवैद्यकांच्या निदर्शनास आले.

अशी आहेत लक्षणेशिंगाच्या कॅन्सरला सुरुवात होताच शिंगे सरळ न वाढता गाेलाकार वाढू लागतात. शिवाय शिंगांना रक्तपुरवठा बंद होतो. परिणामी, शिंगे ठिसूळ आणि निर्जीव होतात. डोळ्याचा कॅन्सर झाल्यास डोळ्यातून पाणी गळते. जनावरे डोळ्यांना खाजवण्यासाठी भिंती, झाडाला डोळा लावतात. डोळे लाल होतात आणि त्यातून रक्त, पू निघण्यास सुरुवात होते.

काय काळजी घ्याल?पशुधनमालकांनी त्यांच्या जनावरांना कॅन्सर सारख्या घातक आजारापासून संरक्षण मिळवायचे असल्यास जनावरांचे शिंगे घासू नये, शिंगांना वाॅर्निशसारखे रसायन लावू नये. शिंगे गोलाकार वाढू लागताच तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. जनावरांच्या डोळ्यातून पाणी गळत असल्यास वेळीच उपचार करावेत. उशीर झाल्यास शस्त्रक्रिया करून डोळा काढावा लागतो, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. गणेश देशपांडे यांनी दिली.

बऱ्याचदा गाय, म्हशींना स्तनाचाही कर्करोग होतो. स्तन सुजणे, दूध पातळ येणे, दूध लवकर नासणे अथवा दुधासोबत रक्त, पू येत असल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे, शिंगाचा आणि डोळ्याचा कर्करोग उपचाराने बरा होतो. कर्करोगाचे निदान झाल्यास पशुधन विक्री न करता उपचार करावेत.- डॉ. असरार अहमद, विभागीय रोग अन्वेषण अधिकारी, पशुसंवर्धन विभाग

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र