शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पार्किंग धोरणाची अंमलबजावणी कागदावरच! शहरांमध्ये दिवसेंदिवस समस्या अधिक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:30 IST

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना सध्या पार्किंगचा प्रश्न सर्वाधिक भेडसावत आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : राज्यात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एवढी वाहने कुठे उभी करायची, हा सर्वात प्रश्न शहरांना प्रामुख्याने भेडसावताेय. पार्किंगचे धोरण निश्चित करा, त्याची अंमलबजावणी करा, असे आदेश सर्व महापालिकांना देण्यात आले आहेत. मात्र राज्यात आजपर्यंत एकाही महापालिकेने पार्किंग धोरणाची अंमलबजावणीच केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना सध्या पार्किंगचा प्रश्न सर्वाधिक भेडसावत आहे. त्यामुळे पार्किंगचे धोरण मोठ्या शहरांनी स्वीकारले असून, त्यावर मागील पाच वर्षांपासून कामही सुरू करण्यात आले. २०१७ पासून या कामाला सुरुवात झाली खरी; पण अंमलबजावणी कुठेच झाली नसल्याचे या क्षेत्रातील वाहतूक तज्ज्ञ तृप्ती अमृतवार, अशोक दातार यांनी सांगितले. छोट्या शहरांमध्ये जागा भरपूर असल्याने सहजपणे वाहन कुठेही उभे करायला मुभा आहे. मोठ्या शहरांमध्ये जागाच नाही. बांधकाम परवानगी घेताना नकाशावर पार्किंगची जागा तर दाखविण्यात येते. नंतर ती जागा गायब होते. पार्किंगची तेवढी जागा फ्रीमध्ये फ्लॅटधारकांना देणे संबंधित व्यावसायिकाला आर्थिकरीत्या परवडतच नाही. त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचे अभ्यासात समोर आले.

एका चारचाकी वाहनाला २०० स्क्वेअर फूट जागा लागते. प्रत्येक वाहन किमान २ ते ४ तासच चालविण्यात येते. उर्वरित २० ते २२ तास वाहन कुठे ना कुठे उभे करावेच लागते. बहुतांश वेळा फुटपाथवर वाहने लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या हक्कांवर हे अतिक्रमण असते. या गंभीर प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार राज्य शासनाला आदेशही दिले आहेत. राज्यातील काही महापालिकांनी पार्किंगचे धोरण निश्चित करण्यासाठी कामाला सुरुवात केली. मात्र एकाही ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

औरंगाबादेत अंमलबजावणी शक्यस्मार्ट सिटी, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मागील काही दिवसांपासून पार्किंग धोरण राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून शहरातील पाच प्रमुख मार्गांवर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.- अपर्णा थेटे, उपायुक्त, महापालिका

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका