शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तोतया आयएएस अधिकारी कल्पनाचा प्रियकर, रॅकेटमधील दोन सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:43 IST

संपूर्ण प्रकरण केवळ फसवणुकीच्याच धर्तीवर येऊन ठेपले; देशविरोधी कृत्याचे पुरावे नाहीत

छत्रपती संभाजीनगर : तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिचा प्रियकर मोहम्मद अशरफ गिल, केंद्रीय मंत्र्यांचा तोतया ओएसडी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई व श्रीगोंद्याचा जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक दत्तात्रय पांडुरंग शेटे यांची चौकशी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

कल्पनाच्या अटकेची देशभरात चर्चा झाली. अफगाणी प्रियकरासोबत मोबाइलमध्ये आढळलेले सौदी अरेबिया, अफगाणिस्तानसह पाकिस्तानमधील कँटॉन्मेंट बोर्डचे अधिकारी, त्यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकांमुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या होत्या. शहर पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा, एटीएसने जवळपास १० दिवस कसून चौकशी केली. मात्र, त्यात केवळ अधिकारी असल्याचा बनाव करून त्यांनी अनेकांकडून विविध कारणांसाठी पैसे उकळल्याचे समोर आले. यात शेवटपर्यंत देशविघातक कृत्याचे पुरावे मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा आहे घटनाक्रम- २३ नोव्हेंबर रोजी पंचतारांकित हॉटेलमधून कल्पना भागवतला अटक.- २८ नोव्हेंबर रोजी तिचा प्रियकर अशरफ, केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाईला दिल्लीतून अटक.- २ डिसेंबर रोजी कल्पनाचा सत्कार केलेले, पैसे दिलेले माजी कुलगुरू एस. एन. पठाण यांनी जबाब नोंदवला.- ३ डिसेंबर रोजी कल्पनाने खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये घेतल्याचे उघड.- ६ डिसेंबर रोजी कल्पनाची न्यायालयीन कोठडीत रवानगी.- ६ डिसेंबर रोजी २०२१ मध्ये कल्पनाच्या संपर्कात आलेल्या शेटेला श्रीगोंद्यातून अटक.- १२ डिसेंबर रोजी उर्वरित तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी.

बँक खाते, कॉल, मेसेजच सबळ पुरावेकल्पना व इतर टोळ्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार, व्हॉटस्ॲप चॅटिंग यांतून तोतया अधिकाऱ्यांचे रॅकेट चालवत असल्याचे सबळ पुरावे आहेत. पोलिस फॉरेन्सिक विभागाकडून ते अधिकृतरीत्या मिळवण्याच्या तयारीत आहेत. शिवाय, या टोळीने पैसे घेतलेल्यांचे जबाब साक्ष म्हणून दोषारोपपत्रात समाविष्ट करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या प्रकरणात पैसे दिलेल्यांच्या सखोल जबाबासह दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake IAS Officer's Lover, Accomplices Jailed in Fraud Case

Web Summary : The lover of a fake IAS officer and two accomplices involved in a fraud racket have been remanded to judicial custody after interrogation. The investigation revealed financial fraud, WhatsApp chats, and money extortion, with authorities gathering evidence for the chargesheet. A deeper probe into those who gave money is ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर