शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामॅरेथॉनसाठी पोलीस प्रशासनाने उभारली सुरक्षेची अभेद्य भिंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:31 IST

शहर पोलिसांच्या अभूतपूर्व सहकार्यांमुळे स्पर्धकांना विनाअडथळा धावण्याची शर्यत पूर्ण करता आली.

ठळक मुद्देकडाक्याच्या थंडीत भल्या पहाटेपासूनच पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावरप्रत्येक धावपटू, स्पर्धकांची वाहिली काळजी 

औरंगाबाद : लोकमतच्या महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूला रस्त्यात कोणत्याही प्रकारच्या वाहनांपासून अडथळा होणार नाही, याची प्रचंड खबरदारी घेण्यासाठी सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत मॅरेथॉन मार्गावर खडा पहारा दिला. शहर पोलिसांच्या अभूतपूर्व सहकार्यांमुळे स्पर्धकांना विनाअडथळा धावण्याची शर्यत पूर्ण करता आली.

लोकमत महामॅरेथॉन स्पर्धा रविवारी पहाटे मोठ्या उत्साहात पार पडली. हजारो स्पर्धक आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर उभ्या असलेल्या नागरिकांमुळे स्पर्धेला उधाण आले होते. लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेतील धावपटंूना कोणताही त्रास होणार नाही, त्यांना अपघात होणार नाही, याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली. स्पर्धेच्या दोन दिवसआधीच विभागीय क्रीडा संकुल ते हडकोतील उद्धवराव पाटील चौकापर्यंतच्या ज्या रस्त्यावरून स्पर्धक धावणार आहेत, तो रस्ता वाहतुकीसाठी स्पर्धेच्या कालावधीकरिता बंद करण्याची अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काढली होती.

यामुळे वाहनचालकांची गैरसोय टळली. नागरिकांनी स्पर्धेच्या कालावधीत त्यांची वाहने रस्त्यावरून न नेल्यामुळे स्पर्धकांना विनाअपघात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त एच. एस. भापकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड हे स्वत: स्पर्धेच्या मार्गावरून गस्तीवर होते. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सिडको शाखेचे निरीक्षक  हनुमंत गिरमे, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांच्यासह सुमारे २१ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांनी वाहतूक आणि बंदोबस्तासाठी कडाक्याच्या थंडीत खडा पहारा दिला. 

विविध ठिकाणी लावलेले बॅरिकेडस्चा ठरले फायदेशीर२१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर आणि दिव्यांग रन, अशा विविध प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या मार्गात अनेक ठिकाणी अचानक रस्त्यावर वाहने येण्याचा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार विविध ठिकाणी बॅरिकेडस् लावून स्पर्धेच्या कालावधीपुरते रस्ते बंद करण्यात आले होते.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस