शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मी आत्महत्या करतोय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:44 IST

मी आत्महत्या करतोय, मला माफ करा. माझ्या कामाचे पैसे भावाला द्या. अशी चिठ्ठी लिहून देवगिरी कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

औरंगाबाद : मी आत्महत्या करतोय, मला माफ करा. माझ्या कामाचे पैसे भावाला द्या. अशी चिठ्ठी लिहून देवगिरी कोविड सेंटरमध्ये काम  करणाऱ्या  सफाई कामगाराने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

रणजित दिगंबर पगारे असे मृताचे नाव असून तो ३० वर्षाचा होता. रणजित काही महिन्यांपासून महापालिकेच्या देवगिरी कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. तेथेच अन्य कामगारांसह एका खोलीस राहायचा.  गुरूवारी स. ८ वाजेच्या सुमारास  त्याने बेडशीटने पंख्याला गळफास घेतल्याचे कामगारांनी पाहिले. भाऊ विशाल पगारे आणि विजय जनार्दन पगारे यांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत  दाखल केले असता अपघात विभागाच्या डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रणजितला त्याच्या कामाचे पैसे दिले नव्हते. त्यांनी जर त्याचे बिल दिले असते तर त्याने आत्महत्या केली नसती, असा आरोप एमआयएमचे पदाधिकारी अरूण बोर्डे यांनी केला आहे. 

घटनास्थही पोलीसांनी सुसाईड नोट सापडली असून मी आत्महत्या करतोय, मला माफ करा. माझ्या कामाचे बिल एक महिन्यानंतर भोंबे साहेब देणार आहेत. ही रक्कम माझ्या भावाला द्या. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही, असे त्यात नमूद केलेले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEmployeeकर्मचारीDeathमृत्यू