शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध असतानाही बांधकाम विभागात उठाठेव; लॉकडाऊनच्या काळात ४.५ कोटींच्या निविदा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:47 IST

मनपाची सर्व कामे ठप्प असताना बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कामांच्या निविदांचा बार उडविण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमहापालिकेच्या हद्दीतील सहा वॉर्डांतील कामेप्रशासकीय मान्यता जून महिन्यात मिळाल्याची चर्चा

- विकास राऊत

औरंगाबाद : लॉकडाऊन असताना बांधकाम विभागाने साडेचार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मंजूर केल्याची माहिती समोर आली. हे एक प्रकरण समोर आले असून, यापेक्षा जास्त कामांच्या निविदांचा कार्यभाग लॉकडाऊनमध्ये उरकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीतील सहा वॉर्डांतील कामांच्या या निविदा आहेत, मनपाची सर्व कामे ठप्प असताना बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कामांच्या निविदांचा बार उडविण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व विकासकामांना शासनाने हळूहळू ब्रेक लावला. या ब्रेकचा फायदा बांधकाम विभागाने घेतला. २९ मार्च रोजी साडेचार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. १२ एप्रिल २०२० पर्यंत निविदांची मुदत ठेवून सगळा कार्यभाग विभागाने साधला. महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी दोन निविदा एकाच ठिकाणाहून २० मिनिटांच्या अंतराने भरण्यात आल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत निविदांना मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय मान्यता जून महिन्यात मिळाल्याची चर्चा आहे.  प्रशासकीय मान्यता जून महिन्यात द्यायची होती, तर मग मार्च महिन्यात निविदा मंजूर करण्याची  घाई कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाच्या औरंगाबाद आणि जालना सर्कलमधील १२५, तर जिल्हा नियोजन विभागाची ५ कोटींची मिळून सुमारे १३० कोटींची रक्कम २७ आणि २८ मार्च या दोन तारखांच्या घोळात अडकून परत गेली आहे. ती रक्कम परत येण्याची शक्यता कमी असताना नव्या निविदांसाठी विभागाने परिश्रम घेतले. 

प्री-बीडदेखील केले नाहीमुख्य अभियंता पातळीवरील निविदांमध्ये प्री-बीड करणे आवश्यक असते; परंतु प्री-बीड न करताच निविदा मंजुरीची घाई कशासाठी केली, अशी कोणती इमर्जन्सी होती? दोन प्रशासकीय मान्यतांची गरज असताना एकत्रित निविदा काढण्यात आल्या. या निविदांमध्ये इतरांना सहभागी होता येऊ नये, यासाठीच ही उठाठेव केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी याच कामांवरून शिवसेनेत राडा झाला होता.

बांधकाम अभियंत्यांचे मत असे...याबाबत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांनी सांगितले की,  निविदा कोणत्या हे माहिती घेतल्याशिवाय सांगता येणार नाही. साडेचार कोटींपेक्षा जास्त निविदा काढल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा ३१ मार्चपर्यंत बंदी होती. नंतर ४ मे रोजी फायनान्स विभागाचा अध्यादेश आला. ३१ मार्च ते ४ मेदरम्यान एखादी निविदा झालेली असेल, तर त्यात काही गैर नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका