शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकद्वारे जनावरांची अवैध वाहतूक

By admin | Updated: July 21, 2014 00:26 IST

औंढा नागनाथ : जवळा बाजार येथून कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या १०७ जनावरांची सुटका ग्रामस्थांसह काही कार्यकर्त्यांनी केली आहे.

औंढा नागनाथ : जवळा बाजार येथून कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या १०७ जनावरांची सुटका ग्रामस्थांसह काही कार्यकर्त्यांनी केली आहे. परभणी-हिंगोली राज्य रस्त्यावर दुपारी २.३० च्या सुमारास जनावरांसह ४ ट्रकच्या चालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जि.प.चे कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, विठ्ठल मगर, माऊली झटे, दत्तराव दराडे, रामप्रसाद पाटील, बबन दुधाटे, ममलेश देशमुख, अनिल देव, पांडु नागरे, नंदू खंदळे, गंगा नागरे, गणेश कुरवाडे, दत्ता सांगळे, सुधाकर जायभाय यांच्यासह अनेक कार्यकर्ते हट्टा येथे आयोजित शिवसेनेच्या बैठकीला जात होते. या दरम्यान परभणी-हिंगोली राज्य रस्त्यावरून ४ ट्रकमध्ये जनावरे घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने त्यांनी आडगाव रंजे. ते हट्टा दरम्यान वाहने थांबवून जनावरे कुठे घेऊन जात आहात? अशी विचारणा केली असता चालकांनी समाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी ट्रक क्र. एम.एच.०४- एफडी ८६४८, एम.एच. २६- एच. १६०२, एम.एच.१६- ५३४६ व एम.एच १४- एफ. १६१५ या वाहनांमध्ये खचाखच जनावरे भरलेली निदर्शनास आली. ही जनावरे जवळा बाजार येथून खरेदी करून परभणी येथील कत्तलखान्याकडे नेली जात असल्याचे ट्रकचालकांनी सांगितले. त्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे फौजदार जमील, जमादार चोंढे, क्षीरसागर, किशोर पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहने व जनावरांचा पंचनामा केला. ट्रक चालकाकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने कार्यकर्त्यांनी सदरील ट्रकमधील ७४ गायी, ५ म्हशी, १७ गोऱ्हे व ११ वघारे अशी एकूण १०७ जनावरे औंढा येथील साई गोशाळेमध्ये आणून सोडली. याबाबत हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)
गुरांची केली सुटका
रविवारी जवळा येथे गुरांचा बाजार असतो. त्याठिकाणी खरेदी केलेली जनावरे परभणीच्या कत्तलखान्याकडे नेली जात होती, असे ट्रकचालकांनी सांगितले.
काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी वाहने थांबवून जनावरांची सुटका करण्यात आली.