शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरात अवैध रसवंत्यांचे पेव; महापालिका एकाही रसवंतीला परवानगी देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 17:43 IST

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अशा अनधिकृत रसवंत्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी रसवंत्यांचे घुंगरू वाजू लागलेखंडपीठाने ९ ते ४५ मीटर रस्त्यांवर कोणालाही तात्पुरतीही परवानगी देऊ नये असे म्हटले आहे.

औरंगाबाद : दरवर्षी शहरात महापालिकेतर्फे रसवंत्यांना तात्पुरती परवानगी देण्यात येत होती. यंदा शहरात एकाही रसवंतीला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका परवानगी देत नसल्याने शहरात मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणी रसवंत्यांचे घुंगरू वाजू लागले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अशा अनधिकृत रसवंत्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील मुख्य चौकांमध्ये दरवर्षी रसवंतीसाठी जागा मिळविण्यासाठी अक्षरश: स्पर्धा लागत होती. गरज पडली तर रसवंतीचालक पाहिजे तेवढी ‘किंमत’ मोजून जागा मिळवत होता. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता विभागातील अधिकारी, कर्मचारी उन्हाळा कधी सुरू होईल, अशी चातकासारखी वाट पाहत असत. अनेकदा रसवंतीसाठी जागा मिळत नसेल तर महापालिकेतील नगरसेवकांचे लेखी पत्रही आणण्यात येत होते. नगरसेवक राजकीय वजन वापरून संबंधितांना जागा मिळवून देत होते. जालना रोड, सिडको-हडको, जुन्या शहरात रसवंती लावण्यासाठी आजही स्पर्धा सुरू आहे. यंदा महापालिकेने एकाही रसवंतीला परवानगी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात बर्फाचा चांगलाच पैसा कमविणाऱ्या रसवंतीचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दररोज मालमत्ता विभागाकडे परवानगीसाठी उंबरठे झिजविण्याचे काम काही रसवंतीचालक करीत आहेत. जुन्या ओळखीचा फायदा घेऊन काही मंडळी थेट महापौरांपर्यंत परवानगी मिळविण्यासाठी वशिला लावत आहेत. गतवर्षी मनपाने ८६ रसवंत्यांना परवानगी दिली होती. मनपाने जेथे जागा नेमून दिली होती, त्यापेक्षा कितीतरी मोठी रसवंती अनेकांनी टाकली होती. जळगाव रोडवर ग्रीन बेल्टमध्ये काहींनी रसवंत्या सुरू केल्या होत्या. शहरात अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. खंडपीठाने ९ ते ४५ मीटर रस्त्यांवर कोणालाही तात्पुरतीही परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे यंदा एकाही रसवंतीला परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मालमत्ता विभागातील सूत्रांनी दिली.

बुधवारी रसवंती बंद केलीपोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ एका व्यापाऱ्याने रस्त्यावरच अनधिकृत रसवंती सुरू केली होती. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच बुधवारी ही रसवंती बंद करण्यात आली. शहरात मुख्य रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणखी कुठे अनधिकृत रसवंती सुरू आहेत, याची माहिती घेणे सुरू करण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव विभागाकडून पुढील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण