शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

अवैध वाळू उपशामुळे पूर्णा नदीचे अस्तित्व धोक्यात; महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:38 IST

चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे.

ठळक मुद्देलाखोंचा महसूल पाण्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र 

चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून शासकीय परवानगी नसताना नदीपात्रातील  आठही वाळूघाटांतून अवैध वाळूउपसा सुरू आहे. अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नियंत्रण ठेवणारे महसूल व पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. पाच वर्षांपासून राजरोसपणे शासनाच्या गौण खनिज मालमतेची लूट होत असताना मात्र संबंधित यंत्रणेने ‘आपण सगळे मिळून खाऊ’ ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. 

चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ही वाळू चांगल्या दर्जाची असल्याने तिला भावही चांगला मिळत असल्याने वाळूमाफियांचा डोळा पूर्णा नदीपात्रातील वाळूच्या उपशावर असतो. पूर्णा नदीकाठी वाकी, चिंचोली लिंबाजी, बरकतपूर, रायगाव, वाकद, शेलगाव, दिगाव, खेडी हे वाळूचे अधिकृत पट्टे आहेत. सरकारी नोंदीनुसार कुठल्याच वाळूपट्टयातून उपसा करण्याची परवानगी नाही, पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट असून सर्रासपणे महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून परिसरात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. 

नागरिकांना होतो त्रास पूर्णा नदीपात्रातील वाकद, शेलगाव वगळता सहाही वाळू घाटात व रस्त्यांवर रात्रभर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरांच्या रांगा दिसून येतात. रात्रभर सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांची अक्षरशः झोप उडाली आहे. मात्र, जबाबदार महसूल व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. किंबहुना अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र सूर्य मावळल्यानंतर बरकतीला येणाऱ्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल हाेते. वाळूचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असली तरी ते आपल्या कुंपणाबाहेर जात नसल्याने वाळूचोरांचे चांगलेच फावते. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र दिवसेंदिवस रुंद होत असून अनेकांच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. यास काही प्रमाणास नदीकाठचे शेतकरीसुद्धा जबाबदार आहेत. पूर्वी नदीकाठचे शेतकरी नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशाला विरोध करायचे. त्यामुळे शेतकरी आणि वाळू माफियांत वाद होत. मात्र, नदीकाठच्या शेतकाऱ्यांनीच वाळूविक्री सुरू केल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. 

टॅग्स :riverनदीAurangabadऔरंगाबादsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग