शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठाचे पद्मविभूषण विजेत्याकडे दुर्लक्ष

By राम शिनगारे | Updated: July 24, 2023 14:01 IST

पद्म गौरव सन्मानाचे पडसाद; विद्यापीठ विद्यार्थी, भूमिपुत्रांना विसरले, बाहेरच्यांना बोलावून केले सन्मानित

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार्थींचा सन्मान सोहळा शनिवारी पार पडला. या सोहळ्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात लढ्यातील अग्रणी एकमेव पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, भूमिपुत्रांचाच प्रशासनाला विसर पडला. मराठवाड्याबाहेरील व्यक्तींना बोलावून सन्मान केला जातो, मात्र भूमिपुत्रांनाच उपेक्षित ठेवल्यामुळे आता वादविवाद सुरू झाले आहेत.

विद्यापीठ प्रशासनातर्फे आयोजित पद्म गौरव सोहळ्यात काेकणातील दादासाहेब इदाते, पुण्यातील गिरीश प्रभुणे, मुंबईतील रमेश पतंगे यांच्यासह शहरातील डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. गंगाधर पानतावणे, फातेमा झकेरिया, बीड जिल्ह्यातील शब्बीर सय्यद यांच्यासह पद्मश्री पुरस्कार नसणारे कृषितज्ज्ञ श्रीरंग लाड यांना सन्मानित केले. पठाण, झकेरिया आणि पानतावणे यांच्या आप्तस्वकीयांनी सन्मान स्वीकारला. लातूरचे पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, साेयगावचे कवी ना. धो. महानोर यांची अनुपस्थिती होती. या सन्मानकर्त्यांची कोणत्या निकषाच्या आधारे निवड केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामचे अमृतमोहत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात राज्य शासनाने कोट्यवधींचा निधी देत विविध ठिकाणी मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे आदेश दिले. त्याचवेळी या लढ्यातील अग्रणी पद्मविभूषण पुरस्कार मिळणारे मराठवाड्यातील एकमेव गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाला राज्यपाल भवनातूनच पुरस्कार्थींची नावे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या महनीय व्यक्तींकडे दुर्लक्षगोविंदभाई यांच्यासह शहरातील प्रसिद्ध शायर पद्मश्री सिकंदर अली वज्द, पद्मभूषण फरीद झकेरिया, पखवाज वादनाला सातासमुद्रापार घेऊन जाणारे बीड जिल्ह्यातील शंकरबापू आपेगावकर, विद्यापीठाचे विद्यार्थी नाट्यदिग्दर्शक डॉ. वामन केंद्रे, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, मराठवाड्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे नांदेडचे शामराव कदम यांचाही विद्यापीठ प्रशासनाला विसर पडला आहे.

'सेलेक्टिव्हिझम' कोणाच्या सांगण्यावरूनविद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्या पुढाकाराने पद्म पुरस्कारार्थींचा सन्मान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला. कुलगुरू महोदय, मराठवाड्याचा मुक्तीलढा आपण विसरला आहात. या लढ्यातील नायक गोविंदभाई श्रॉफ यांच्या कुटुंबीयांचा विसर तुम्हाला पडला. हे 'सेलेक्टिव्हिझम' कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले? याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल.-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाEducationशिक्षण