शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चांगले उपचार हवेत, तर पैसे भरा; योजनेत मोफत उपचार, तरीही होतोय रुग्णांचा खिसा रिकामा

By संतोष हिरेमठ | Updated: October 14, 2023 18:17 IST

योजनेंतर्गत मिळणाऱ्या संपूर्ण मोफत सुविधेविषयी कसलीही अडचण असल्यास रुग्णांनी आरोग्य मित्राशी संपर्क साधावा

छत्रपती संभाजीनगर : आरोग्य योजनेतील पॅकेजमधून क्वालिटीचे इम्प्लांट, सर्जिकल साहित्य मिळणार नाही. चांगले साहित्य पाहिजे असेल तर थोडे पैसे भरावे लागतील. रुग्णासाठी थोडा विचार करा, असे म्हणत रुग्णांचा, नातेवाइकांचा खिसा रिकामा करण्याचा प्रकार काही खाजगी रुग्णालयांमध्ये सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतलेला असताना अनेक बाबी पुढे करून योजनेतील रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळले जात आहे. योजनेत जे पॅकेज आहे, त्यातून चांगले उपचार, शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे कारण काही ठिकाणी पुढे केले जात आहे. रुग्णाचा विचार करून नातेवाईक पैसे मोजून मोकळे होत असल्याची परिस्थिती आहे. योजनेमध्ये आजार बसतो की नाही व योजनेमध्ये आजार बसत असेल तर योजनेंतर्गत मिळणाऱ्या संपूर्ण मोफत सुविधेविषयी कसलीही अडचण असल्यास रुग्णांनी आरोग्य मित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

वर्षभऱात किती शस्त्रक्रिया,किती दावे मंजूर?१ एप्रिल २०२२ ते ९ मार्च २०२३ या कालावधीदरम्यान एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांमध्ये २५ हजार ५७७ लाभार्थ्यांनी ५१ हजार २५१ शस्त्रक्रिया उपचाराचा लाभ घेतला. त्यासाठी योजनेंतर्गत १४८ कोटी ९८ लाख ५३ हजार ४६६ रुपयांचे दावे मंजूर झाले.

योजनेतील साहित्य स्टँडर्डयोजनेतील रुग्णांसाठी जे साहित्य वापरले जाते, ते स्टँडर्ड असतात. योजनेत उपचार होत असताना पैशांची मागणी होत असेल तर आरोग्य मित्रांकडे तक्रार करावी. तक्रार केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करता येते.- डाॅ. मिलिंद जोशी, जनआरोग्य योजना जिल्हा व्यवस्थापक

योजनेतील स्क्रू क्वाॅलिटीचे नाहीत म्हणालेजवळच्या व्यक्तीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी योजनेतून क्वाॅलिटीचे स्क्रू मिळणार नाही, असे एका रुग्णालयात सांगण्यात आले. क्वाॅलिटीचे स्क्रू हवे असतील तर वेगळे पैसे भरावे लागतील, असे सांगितले. यासंदर्भात मी हेल्पलाइनवर तक्रार केली.- ॲड. राजेंद्र राठोड

पॅकेजचा खर्च वाढविणे गरजेचेचांगल्या उपचारासाठी योजनेतील पॅकेजचा खर्च वाढविणे गरजेचे आहे. योजनेतील रुग्णांकडून रुग्णालयांनी पैसे घेता कामा नये. रुग्णांच्या नातेवाइकांनी देखील पैसे देता कामा नये.- डाॅ. अजित भागवत, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ

- जिल्ह्यात योजनेशी संलग्नित रुग्णालये- एकूण ३८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्य