शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2024 17:33 IST

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने शोधून काढलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते करीत आहेत. त्यांचे ऐकून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील, अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

वडिगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडविताना राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत, त्या रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मंत्री होते. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारला महागात पडेलते म्हणाले की, आमची एकही नोंद खाेटी नाही. मात्र, त्यांचे ऐकून नोंदी रद्द करणार असाल तर हे चूक आहे. कुणबी नोंदी रद्द करणे सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझा समाजासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी लढणं सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते सरकारपुरस्कृत उपोषणवडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले त्यांचे पंटर असल्याचे भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितले. यावरून हे सरकारपुरस्कृत उपोषण असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. ज्या प्रकारे ओबीसी नेते एकत्र झाले, त्याची दखल घेऊन विविध राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. तुम्ही एकत्र आला नाही तर मराठा लेकरांचे वाटोळे होईल, असेही ते म्हणाले.

काेयत्याने हातपाय तोडण्याची त्यांची भाषा कशी आहे?भुजबळांविषयी आपल्या एकेरी भाषेविषयी कुणबी नेते तायवाडे शनिवारी बोलले. तायवाडे हे मोठे नेते आहेत, त्यांनी समान न्याय करणे अपेक्षित आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर होता तेव्हा ओबीसी नेत्यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली होती. शिव्या दिल्या होत्या. आता मी बोललो तर तुम्हाला खालची भाषा वाटते, असा सवाल जरांगे यांनी केला.

भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत आहेतआमच्या नोंदी सापडल्यामुळे धनगर बांधवांचं काय नुकसान झालं? धनगर समाजाला मिळालं तेव्हा आम्ही कुठे विरोध केला. मग का धनगर समाज आमच्या विरोधात जात आहे, असा सवाल करीत भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ