शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

वक्फमध्ये बिगर मुस्लिमांना घेता, मग आम्हाला शिर्डीच्या साई संस्थानमध्ये घेणार का?; जलील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:16 IST

वक्फ सुधारणा विधेयकावरून इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे.

Imtiyaz Jaleel: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या विधेयकावरून इंडिया आघाडीकडून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. वक्फ बोर्डात तुम्ही बिगर मुस्लीम समाजातील लोकांना घेणार असाल तर आम्हाला हिंदू देवस्थानांच्या संस्थानांमध्ये घेणार आहात का? असा बोचरा सवाल जलील यांनी विचारला आहे.

केंद्र सरकारवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले की, "वक्फ बोर्डात तुम्ही बिगर मुस्लिमांचा समावेश करत आहात. बिगर मुस्लीम समाजातील हुशार लोकांना आम्ही या बोर्डात घेऊ, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मुस्लीम समाजात हुशार लोकं नाहीत का? तुमच्यापेक्षा हुशार लोकं मुस्लीम समाजात आहेत.  तुम्हाला तसा निर्णय घ्यायचा असेल तर घ्या, पण मग तुम्ही इम्तियाज जलीलला शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टमध्ये घेणार आहात का? तिरुपतीचं जे देवस्थान आहे त्या संस्थानमध्ये तुम्ही मला घेणार आहात का?" असा सवाल जलील यांनी सरकारला विचारला आहे. 

"शिख समाजाचे जे बोर्ड आहे त्यामध्ये शिख समाजाशिवाय दुसरं कोणी जात नाही. कोणालाही परवानगी नाही. मग तुम्ही फक्त मुस्लीम समाजाबाबत असं का करत आहात?" असं म्हणत इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे.

"आम्ही या विधेयकाला सुरुवातीपासून विरोध करत आहोत. मुस्लीम समाजाशी संबंधित कोणता वादग्रस्त मुद्दा काढता येतोय का, हे केंद्र सरकार पाहात होते. त्यामुळेच त्यांनी हे विधेयक आणलं आहे. काल संसदेत या विधेयकाच्या जे समर्थनात होते आणि जे विरोधात होते, त्यांच्यात खरंतर फार फरक नव्हता. मुस्लीम समाजातील गरीब लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही हे विधेयक आणत असल्याचं सरकारने सांगितलं. सरकारने आता वक्फ बोर्डाचं महत्त्व कमी करून या बोर्डाच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना आणून बसवलं आहे. बोर्डाने एखादा दावा केला तरी जिल्हाधिकाऱ्यांचा दावा अंतिम असणार आहे. वक्फ बोर्डाला आता हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात लढावं लागणार आहे. पण या देशात ५ कोटी २० लाख केसेस आधीच पेंडिंग आहेत. आता आणखी केसेस वाढतील. पण खरंच न्याय मिळणार आहे का, हा प्रश्न आहे," असंही आपली भूमिका मांडताना इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलwaqf board amendment billवक्फ बोर्डAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनshirdiशिर्डी