शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'शहरातील उड्डाणपूल चांगले असतील तर ठेवू अन्यथा पाडू';चिकलठाणा-वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 11:49 IST

सरसकट उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात एनएचएआयकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्ती करण्यासंदर्भात आदेश

औरंगाबाद : चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच उड्डाणपूल बांधण्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंजुरी देत औट्रम घाट बोगदा निर्मितीसाठी काही महत्त्वपूर्ण पर्यायदेखील सुचविले, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad) यांनी दिली. एकच उड्डाणपूल बांधताना शहरातील विद्यमान उड्डाणपूल चांगले असतील तर ते वापरात आणू, अन्यथा पाडून टाकू, असेही मत गडकरी यांनी व्यक्त केल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील महामार्गप्रश्नी गुरुवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीमध्ये डॉ. कराड यांनी चिकलठाणा ते वाळूजपर्यंत उड्डाणपूल, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे रुंदीकरण करणे, औरंगाबाद ते वैजापूर शिर्डी मार्गाचे १० मीटरपर्यंत रुंदीकरणासह दुहेरीकरण, कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात रुंदीकरण आणि काही ठिकाणी बोगदे करण्याबाबतचे मुद्दे मांडले.

औट्रम घाटात १४ किलोमीटरचे अंतर असून, धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे. त्याठिकाणी छोटे-छोटे बोगदे या महामार्गावर प्रस्तावित करावेत, असे आदेश गडकरी यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळूजपर्यंत सरसकट उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात एनएचएआयकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्ती करण्यासंदर्भातही त्यांनी आदेश दिले. नगर नाका ते माळीवाडामार्गे दौलताबाद टी पॉइंटपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत या बैठकीत विचार झाला. ए.एस. क्लब ते वैजापूरमार्गे शिर्डी मार्गाचे मजबुतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. यावेळी एनएचएआयएचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आशिष आसाडी, बी.डी. ठेंग, विभागीय प्रादेशिक अधिकारी अरविंद काळे, उद्योगपती विवेक देशपांडे आदी उपस्थित होते.

बोगद्याचा खर्च सहा हजार कोटींवरऔट्रम घाटातील बोगद्याचा खर्च सहा हजार कोटींवर गेला आहे. सुमारे १४ किलोमीटर बोगदा करण्याऐवजी गरज पडेल तेथे छोटे बोगदे करावेत. तसेच उर्वरित घाटात चौपदरीकरण करून महामार्ग रुंद करून काम लवकर संपवावे, अशा सूचना गडकरी यांनी केल्या. चिकलठाणा ते वाळूजपर्यंत प्रस्तावित उड्डाणपूल बांधताना मेट्रोमार्ग देखील त्यातच विकसित केला जाईल, याचा विचार डीपीआरमध्ये होणार आहे. यामुळे मेट्रोचा स्वतंत्र मार्ग उभारण्याचा खर्च लागणार नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबाद