शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बिल थकले तर रिमोटने होईल वीज खंडित; नवीन 'टीओडी' मीटरची रीडिंगही ऑटोमॅटिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:48 IST

सध्या हे मीटर महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाइल टॉवर ग्राहकांना बसविले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर सर्व वीजग्राहकांना बसवले जात आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्या ग्राहकांना हे मीटर बसविले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर मासिक बिल दिले जाणार आहे. या मीटरमध्ये कोणी फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास महावितरणला लगेच कळून वीजचोरी पकडली जाईल. या मीटरमधील सुविधेमुळे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच बसून रिमोट पद्धतीने खंडित करता येणार आहे. यामुळे डिस्कनेक्शनसाठी लागणारा वेळ व मनुष्यबळ वाचणार आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

सध्या हे मीटर महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाइल टॉवर ग्राहकांना बसविले जात आहेत. नवीन वीजजोडणीसाठीही हे मीटर बसवले जात आहेत. नादुरुस्त मीटरच्या जागीही हे मीटर बसविले जात आहेत. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांना हे मीटर बसवले जातील.

या मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून, मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडलेला असतो, त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डेटा महावितरणकडे उपलब्ध होईल. हे मीटर टीओडी (टाइम ऑफ डे) असल्याने दिवसाच्या कोणत्या वेळेला किती वीज वापरतोय, याची अचूक माहिती ग्राहक व महावितरणला मिळेल.

४,६७५ ग्राहकांना बसविले मीटरछत्रपती संभाजीनगर परिमंडळात आतापर्यंत ४ हजार ६७५ ग्राहकांचे आधीचे मीटर काढून टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. तसेच नवीन १ हजार १०५ वीजजोडणीसाठीही टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.

रीडिंगही ऑटोमॅटिकया मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. सध्या मीटर रीडिंग घेण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीला द्यावा लागणारा खर्च वाचणार आहे. सध्या रीडिंग घेताना काहीवेळा मीटर रीडर चुका करतात किंवा विलंब करतात, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो. मात्र टीओडी मीटरमध्ये ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांचा त्रास वाचेल.

भुर्दंड नाहीहे मीटर बसविण्यासाठी ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा भुर्दंड बसणार नाही. ही केंद्र सरकारची योजना असल्याने मीटर बसविण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. टीओडी मीटर बसविल्याचा वीजदर वाढीवर कसलाही परिणाम होणार नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरण