शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेल्वेत मोबाईल चोरी गेला तर, टीसी दाखल करून घेणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 16:37 IST

mobile stolen in the train : रेल्वेतून उतरण्याची गरज नाही, प्रवास पूर्ण झाल्यानंतरही करता येते तक्रार

औरंगाबाद : रेल्वे प्रवासात मोबाईल किंवा इतर वस्तू चोरीला गेली तर गाडीखाली उतरून रेल्वे पोलिसांत जाण्याची आता गरज नाही. टीसी किंवा रेल्वे पोलीस रेल्वेतच गुन्हा दाखल ( TC will file a mobile stolen case in Train ) करून तो जीआरपीकडे वर्ग करतात. त्याबरोबर प्रवासाच्या निश्चितस्थळी पोहोचल्यानंतरही प्रवाशांना गुन्हा दाखल करता येतो.

रेल्वे प्रवास करताना अनेकदा मोबाईल, पाकीट, सामान चोरीला जाते. अशावेळी प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर उतरून तक्रार देण्याचा सल्ला दिला जातो. त्यात प्रवासाचे नियोजन बिघडून जाते. परंतु आता रेल्वेतून न उतरताही प्रवाशांना तक्रार देणे शक्य आहे.

देशात कुठेही तक्रार दाखल करणे शक्यज्या हद्दीत गुन्हा घडला, तेथेच तक्रार द्यावी, असे नाही. देशात कोठेही तक्रार दाखल करता येते. कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ती गुन्हा घडलेल्या संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केली जाते. अशाचप्रकारे कोणत्याही रेल्वेस्टेशनवरील लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रवाशांना तक्रार देता येते.

कोरोनाकाळात चोरीच्या घटना घटल्यागतवर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर रेल्वे बंद करण्यात आल्या. त्यानंतर जून २०२० पासून टप्प्या-टप्प्यांत रेल्वेगाड्या सुरू झाल्या. प्रवासासाठी आरक्षित तिकीट बंधनकारक करण्यात आले. शिवाय स्टेशनमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यावर भर देण्यात आली. त्यामुळे कोरोनाकाळात रेल्वेत चोरीच्या घटना होण्याचे प्रमाण कमी झाले.

प्रवाशांचा वेळ वाचणार, तपासही जलदरेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान १३९ या क्रमांकावरही तक्रार देता येते. त्याबरोबर ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांना तक्रार करता येते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातून प्रवाशांचा कागदोपत्री तक्रार करण्यात जाणारा वेळ वाचतो शिवाय तपासही जलद गतीने होण्यास मदत होते.

टीसींकडे असतो अर्जरेल्वेतील टीसींकडे असलेला अर्ज भरून प्रवाशांना त्यांची तक्रार देता येते. हा अर्ज लोहमार्ग पोलीस ठाण्यात येतो. त्यावरून तपास केला जातो. काही वेळेस माहिती अपुरी असेल तर प्रवाशाकडून अधिकची माहिती घ्यावी लागते. त्याबरोबर प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने आणि इतर कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देता येते. ती तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होते, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे