शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करू: संजय राऊत

By बापू सोळुंके | Updated: August 13, 2024 18:53 IST

 एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले.  

छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने आणलेल्या योजना या बहिणींसाठी नसून आगामी विधानसभा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. आमचे सरकार आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी खा.राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांची मुदत संपून तीन ते पाच वर्ष उलटत आहेत. मात्र या निवडणूका घेतल्या जात नाही. आता राज्यातील वातावरण प्रतिकूल असल्याने आगामी विधानसभा निवडणूक घेण्याची हिम्मत नाही, पण नाईलाजास्तव त्यांना या निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे खा.राऊत म्हणाले. पंतप्रधानांना देशभर सभा घेता याव्यात, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तारखा मॅनेज केल्या होत्या. मात्र महाराष्ट्रातील विरोधीपक्ष आणि जनता जागरूक असल्याने या सरकारला निवडणूक घेताना कोणताही घोळ घालता येणार नाही. आणखी काही योजना आणण्यासाठी राज्यसरकार विधानसभा निवडणूक एक महिना पुढे ढकलणार असल्याची चर्चा आहे, याकडे तुम्ही कसे पाहता या प्रश्नाचे उत्तर देताना खा.राऊत म्हणाले की, सर्व प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यासाठी आहे. त्यांनी जाहिर केलेल्या योजना बहिणींसाठी नसून मते विकता घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. आमदार रवी राणा यांनी  मते न केल्यास लाडक्या बहिण योजनेचे पैसे परत घेतल्या जाईल, असे विधान केल्याकडे खा.राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ही यांची खरी मानसिकता आहे. पैसे का त्याच्या बापजाद्यांचे आहेत का, असा सवाल करीत हे पैसे लाडक्या बहिणींच्या हक्काचे आहेत.  एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले.  महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार आल्यावर लाडक्या बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी विधानसभेत गद्दार आमदार दिसणार नाहीयोजनांविषयी यांचा हेतू चांगला नाही. यामुळे बारामतीमध्ये लाडक्या बहिणींनी अजीतदादांना आधीच पराभूत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील गद्दार दिसणार नाही,असेही शिवसेना नेते म्हणाले.

उद्धव ठाकरेपेक्षा चांगला चेहरा काँग्रेसकडे आहे कामुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेपेक्षा चांगला चेहरा आहे का,असेल तर काँग्रेसने दाखवावा, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAurangabadऔरंगाबाद