शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
“काँग्रेसनेच संविधान कलंकित केले, मतचोरी करून इंदिरा गांधींचा रायबरेलीत विजय”: निशिकांत दुबे
3
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
4
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
5
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
6
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
7
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
8
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
9
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
10
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
11
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
12
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
13
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
14
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
15
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
16
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
17
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
18
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
19
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
20
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअर जेम्स प्रिन्सेप नसते तर ‘धम्मलिपी’ आणि सम्राट अशोक जगासमोर आले नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:03 IST

जेम्स प्रिन्सेप हे ब्रिटिश इंजिनिअर असूनही त्यांनी धम्म लिपी संशोधनाचे अमूल्य कार्य केले

छत्रपती संभाजीनगर : जेम्स प्रिन्सेप यांचे लिपी संशोधन नसते, तर सम्राट अशोक यांच्यासारखा महान राजा व त्यांचे धम्म विचार जगासमोर आले नसते. जवळपास २२०० वर्षे लोकांना असा सम्राट अस्तित्वात असल्याचा पत्ताच नव्हता. जेम्स यांचे संशोधन ही भारतीय व बौद्ध धम्मासाठी गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन इंजि. भास्कर म्हस्के यांनी केले.

जेम्स प्रिन्सेप हे इंजिनिअर असूनही त्यांनी भारताच्या इतिहासातील लिपी संशोधनाचे अमूल्य कार्य केले. भारताच्या शिलालेखांचा आणि सम्राट अशोकांच्या ‘धम्मलिपी’चा जगास परिचय करून देणारे महान संशोधक जेम्स प्रिन्सेप यांना २२६व्या जयंतीनिमित्त साकेत बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आले. यावेळी म्हस्के बोलत होते.

पुढे बोलताना म्हस्के म्हणाले, जेम्स प्रिन्सेप हे केवळ एक अभियंता नव्हते, तर ते एक कुशल कलाकार आणि जिज्ञासू संशोधक होते. १८१९ मध्ये भारतात आल्यावर त्यांनी सुरुवातीला वाराणसीतील इमारतींचे डिझाईन, सांडपाण्याची व्यवस्था आणि जुन्या वास्तूंची दुरुस्ती यासारखी अनेक कामे केली. वाराणसीतील टांकसाळीसाठी अचूक तापमान मोजण्याचे उपकरण आणि ०.१९ ग्रॅम वजनाचे तराजू यांसारखी आधुनिक साधने त्यांनी तयार केली. मात्र, त्यांचे खरे कार्य प्राचीन लिपींच्या शोधातून उघड झाले. प्रिन्सेप यांना प्राचीन नाण्यांवर आणि शिलालेखांवर कोरलेली अक्षरे नेहमी आकर्षित करत होती. त्यांनी ओरिसातील खडकांवरील आणि बिहारमधील बेतिहा येथील शिलालेखांचे ठसे मिळवून त्यांचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी भारतातील अनेक संस्कृत पंडितांनाही ही अक्षरे वाचता येत नव्हती. पण प्रिन्सेप यांनी हार मानली नाही. त्यांनी बॅक्टेरिया आणि कुषाण राजांच्या इंडो-ग्रीक नाण्यांचा अभ्यास करून ‘खरोष्ठी’ या प्राचीन लिपीचा शोध लावला.

धम्मलिपिचा शोध: ‘देवानांपिय पियदस्सिन’ ते ‘सम्राट अशोक’जेम्स प्रिन्सेप यांच्या या संशोधनामुळे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि शिलालेख त्यांच्याकडे पाठवले जाऊ लागले. त्यांनी अनेक शिलालेखांचा अभ्यास करताना 'दानं' हा शब्द अनेक ठिकाणी शेवटी आलेला आढळला आणि त्यावरून त्यांनी या लिपीचे पहिले अक्षर ओळखले. अखेर १८३७ मध्ये त्यांनी भारतीय शिलालेखांमधील अक्षरे वाचण्यात यश मिळवले. अनेक शिलालेखांवर त्यांना वारंवार ‘देवानांपिय पियदस्सिन’ हा शब्द आढळून आला. सुरुवातीला त्यांना वाटले की हा श्रीलंकेचा राजा असावा, कारण महावंस या ग्रंथात तसा उल्लेख होता. पण श्रीलंकेच्या राजाचे शिलालेख भारतात का असतील, या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले. सहा आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर, श्रीलंकेतील त्यांच्या मित्राने पाठवलेल्या पाली भाषेतील काही संदर्भ ग्रंथांच्या मदतीने त्यांनी 'देवानांपिय पियदस्सिन' हे नाव सम्राट अशोकांचेच आहे हे सिद्ध केले. या एका शोधाने भारतीय आणि जागतिक इतिहासाची दिशा बदलली. जवळपास २२०० वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या मौर्य साम्राज्याच्या सर्वात महान सम्राटाचा इतिहास जगासमोर आला. प्रिन्सेप यांनीच धम्मलिपीमधील  शिलालेखांच्या अभ्यासातून सम्राट अशोकांचे न्याय, नीती आणि लोककल्याणकारी शासन जगाला दाखवले. १९१५ मध्ये कर्नाटकातील मस्की येथे सापडलेल्या शिलालेखावर ‘अशोक’ असे स्पष्ट नाव आढळल्यावर प्रिन्सेप यांच्या निष्कर्षांची अचूकता सिद्ध झाली आणि त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.

पुढील पिढ्यांसाठी प्रेरणाजेम्स प्रिन्सेप यांनी केवळ धम्मलिपीचा शोध लावला नाही, तर त्यांनी भारतीय संस्कृतीतील अनेक अज्ञात गोष्टी उघड केल्या. त्यांचा हा शोध भारतीयांसाठी आणि विशेषतः बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असेही भास्कर म्हस्के म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जेम्स प्रिन्सेप आणि लॉर्ड कॅनिंगहॅम यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा गौरव विहारांमध्ये व्हायला हवा, कारण त्यांनीच बौद्ध धम्माची खरी माहिती पुन्हा एकदा जगासमोर आणली. यावेळी भंते श्रद्धारक्षित यांनीही प्रिन्सेप यांच्या योगदानावर भाष्य केले. या कार्यक्रमाला साकेत बुद्ध विहार समितीचे सदस्य आणि अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणSocialसामाजिक