शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कचºयावरून शहरात एकीकडे रणकंदन माजले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील ठाकरेनगर व पवननगर हे वॉर्ड ...

ठळक मुद्देआदर्श उपक्रम : ठाकरेनगर, पवननगरात ओल्या कचºयापासून खतनिर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचºयावरून शहरात एकीकडे रणकंदन माजले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील ठाकरेनगर व पवननगर हे वॉर्ड असे आहेत की, त्यांना नारेगावकरांनी केलेल्या ‘कचरा कोंडी’शी काहीच सोयरसुतक नाही. या वॉर्डात मागील दोन वर्षांपासून ओल्या कचºयापासून खत तयार केला जात असून, ते शेतकºयांना मोफत दिले जात आहे.नारेगावच नाही तर शहराच्या आसपासच्या कोणत्याही गावातील गावकरी कचरा टाकून देण्यास तयार नाहीत. नारेगावात कचरा टाकू नये, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोटावर मोजण्याइतकेच काही वॉर्ड शहरवासीयांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. या वॉर्डात निघणाºया कचºयाची विल्हेवाट वॉर्डातच लावली जाते. यात पवननगरात (वॉर्ड क्र.३०) २०१५ पासून वर्गीकरण करून ओल्या कचºयाचे खत तयार केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून येथील नागरिक ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटागाडीत टाकतात. सर्व कचरा फरशी मैदानावर आणला जातो. मैदानाच्या कडेला ११ खड्डे करण्यात आले आहेत. त्यात ओला कचरा टाकण्यात येतो. सात दिवसांनंतर तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. सुक्या कचºयामध्ये प्लास्टिक, लोखंड, कागद हे विक्री केले जातात. याच पद्धतीने ठाकरेनगरातील (वॉर्ड क्र. ८१) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानात ओल्या कचºयापासून खत तयार करण्यासाठी मोठे खड्डे के ले आहेत. येथेही दर आठवड्याला तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. तसेच सुका कचरा भंगारात विकल्या जातो. हा सुका कचरा घेण्यासाठी भंगार विक्रेते मैदानात गाडी घेऊन येतात व तेथेच वजन करून त्याचे पैसे स्वच्छता कर्मचाºयांना देतात. शहरात जागोजागी कचºयाचे ढिगारे लागले असताना हे वॉर्ड स्वच्छ आहेत. येत्या काळात प्रत्येक वॉर्डात अशाच प्रकारे कचºयाचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी लागेल.मात्र, त्यासाठी वॉर्डाचा कायापालट करण्याचा निर्णय नगरसेवकांना घ्यावा लागणार आहे. नगरसेवक व नंतर रहिवाशांची मानसिकता बदलावी लागणार आहे. तरच कचरामुक्त व स्वच्छ शहराची कल्पना प्रत्यक्षात उतरेल. कोणत्याही नेत्याला चीनमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.दोन वर्षांपासून वॉर्डात होते कचºयाचे खतमागील दोन वर्षांपासून ठाकरेनगर वॉर्डात आम्ही ओल्या व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करीत आहोत व मनपाच्या मैदानातच कोपºयात खड्डे खोदून तेथे ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करीत आहोत. दररोज २ ते ३ टन कचºयाची येथे खतनिर्मिती केली जाते. ६ महिन्यांपूर्वी मनपाला ३५ लाख रुपयांचे बजेट असलेले प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. यात ओल्या व सुक्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी, सोयी-सुविधा पुरविण्यासाठीच्या उपाययोजना होत्या. मात्र, मनपा प्रशासनाने प्रस्ताव लालफितीत ठेवला आहे.-दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक (ठाकरेनगर वॉर्ड)दररोज ६ टन कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाटमागील तीन वर्षांपासून पवननगर वॉर्डात दररोज ५.५० लाख ते ६ लाख टन कचºयाचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी फरशी मैदानावर ११ खड्डे तयार करण्यात आले. त्यात ४ टन ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. दररोज सुमारे ५ हजार रुपयांचा सुका कचरा (ज्यात भंगार असते) विकल्या जातो. त्याचे पैसे स्वच्छता कर्मचाºयांना वाटून दिले जातात. खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. मागील तीन वर्षांत पवननगर वॉर्डातून नारेगाव येथे कचरा पाठविण्यात आला नाही. वॉर्डातच त्याचे विघटन करण्यात आले. यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करावी लागली. -नितीन चित्ते, नगरसेवक (पवननगर वॉर्ड)