शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा टाकल्यास मनपा व्यापाऱ्यांना सरसकट दंड आकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 14:04 IST

मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

ठळक मुद्दे शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

औरंगाबाद : बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट आहे. विभागनिहाय कचरा निचरा करण्याच्या निर्णयानंतर मनपाकडून आता शहरातील कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. यातूनच मनपाने व्यापाऱ्यांकडे होणाऱ्या कचऱ्याकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचऱ्याच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

सोयीसाठी २ वेळा कचरा उचलण्यात येतोटिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाऱ्यांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.

दोन लाखाच्या दंडाचे टार्गेट शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत आहे. व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने दररोज किमान दोन लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. निधी मनपाच्या तिजोरीत आला पाहिजे असेही पदाधिकाऱ्यांनी शेवटी नमूद केले.

दंड लावणे हा उपाय नाही...व्यापाऱ्यांनी नेहमीच महापालिकेला सहकार्य केले आहे. औषधी भवन येथील व्यापारी आता कचरा कुंडीत किंवा रस्त्यावर टाकत नाहीत. सर्व कचरा एकत्र जमा करून मनपाच्या घंटागाडीकडे देतात. महापालिकेने अगोदर आपली यंत्रणा मजबूत करावी. सकाळी जेव्हा व्यापारी प्रतिष्ठाने उघडतात तेव्हा घंटागाडी फिरवावी. सायंकाळीही उशिरा एक रिक्षा या भागात आल्यास सर्व व्यापारी आपला कचरा त्याला देतील. मनपाने आपली यंत्रणाच मजबूत केलेली नाही. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा टाकण्यात कोणालाही आनंद होत नाही. मजबुरीने त्याला टाकावे लागते. व्यापाऱ्यांना, नागरिकांना दंड आकारून हा प्रश्न सुटणार नाही. - अजय शहा, माजी अध्यक्ष, व्यापारी महासंघ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नbusinessव्यवसायpaithan gateपैठण गेट