शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटीचे भूमिपूजन झाले; मात्र मराठवाड्यातील इतर संस्थाना निधी कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 19:54 IST

घोषणा केलेल्या जालना, लातूर येथील पॉलिटेक्निकचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्थांच्या निर्मितीसाठी अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्दे ४ आक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणांची अद्याप पूर्तता नाही महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला बांधकामासाठी एकही रुपया मिळालेला नाही.

औरंगाबाद : ४ आक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणा केलेल्या ‘इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी’ संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी (दि.४) जालन्याजवळील शिरसवाडी येथे झाले.  मात्र, याचवेळी घोषणा केलेल्या जालना, लातूर येथील पॉलिटेक्निकचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्थांच्या निर्मितीसाठी अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला बांधकामासाठी एकही रुपया मिळालेला नाही. हा निधी देण्याची मागणी मराठवाड्यातील नागरिक करीत आहेत.

मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्राचा असलेला मागासपणा दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक संस्था सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, यातील ‘आयसीटी’ या संस्थेच्या उपकेंद्रासाठीच ३९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत संस्था कार्यान्वित केली. याचे उद््घाटन आज सकाळी ११.३० वाजता झाले. उर्वरित घोषणांमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला १५० कोटी रुपयांपैकी एकही रुपया देण्यात आलेला नाही. 

विधी विद्यापीठाचा निधी कधी मिळणार तसेच मागील वर्षी सुरू झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या जागेचा, बांधकाम सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही सोडविण्यात आलेला आहे. या विद्यापीठासाठी २३२ कोटी रुपयांचा बांधकाम प्लॅन राज्य सरकारला सादर केलेला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

महाविद्यालयांची मंजुरी प्रलंबित याचवेळी याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना व लातूर जिल्ह्यात दोन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. त्यापैकी प्रत्येकी एका महाविद्यालयाची श्रेणी बदलून त्याचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी केवळ लातूरच्या पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव ‘एआयसीटी’कडे दाखल झालेला आहे. त्यावरही कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे सर्व प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. मराठवाड्यासाठी घोषित झालेल्या या संस्थांना निधी आणि मंजुरी देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

‘स्पा’ची घोषणा हवेतचमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी विधि विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ (स्पा) संस्थेची उभारणी लवकरच औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारने कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाfundsनिधीState Governmentराज्य सरकारNational Law Universityनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी