शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भावाच्या खुनात मलाच फसवणार होते; मृत विकास बनसोडेच्या भावाने सांगितली थरारक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:18 IST

सरकार न्याय द्या, भावाला मारणाऱ्या आरोपींना फासावर चढवा; मयत विकास बनसोडेच्या भावाची मागणी

छत्रपती संभाजीनगर : ‘माझ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा,’ अशी भावना प्रेमसंबंधाच्या संशयावरून आष्टी तालुक्यात डांबून केलेल्या मारहाणीतील मयत विकास बनसोडे या तरुणाच्या भावाने व्यक्त केली. विकासचे सोमवारी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शरीरावर अनेक ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव व शाॅकमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.

विकासचे पार्थिव रविवारी रात्री शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले. सोमवारी सकाळी १०:३० वाजता शवविच्छेदनाला सुरुवात झाली. दोन तास शवविच्छेदन चालले. घाटीत मयत विकासचा भाऊ आकाश बनसोडे याच्यासह नातेवाईक उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना आकाश म्हणाला, विकाससोबत दोन-तीन दिवसांपासून बोलणे झाले नव्हते. थेट त्याच्या मृत्यूचीच माहिती मिळाली. त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व १० आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याने केली.

मामा म्हणायचो, त्यांनीच...आकाश बनसोडे म्हणाला, माझे आई-वडील हे ऊस तोडीसाठी जायचे. त्यातूनच भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याशी ओळख निर्माण झाली. आधी मीही त्यांच्याकडे कामाला होतो. त्यांना आम्ही मामा म्हणत होतो. परंतु त्यांनीच भावासोबत असे केले.

भावाच्या खुनात मलाच फसवणार होतेभावाच्या खुनात मलाच फसविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. भावानेच भावाला मारले, असे दाखविण्याचा डाव होता, असेही आकाश बनसोडे म्हणाला. दरम्यान, नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस अधीक्षक डाॅ. अनिता जमादार यांनी घाटीत आकाश बनसोडे याची भेट घेत संवाद साधला.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड