शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मी मंत्री होईल असे वाटले नव्हते, जनतेमुळेच हे शक्य झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 19:11 IST

Raosaheb Danave : सिल्लोड शहरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा नागरी सत्कार

सिल्लोड ( औरंगाबाद ) : नागरी सत्कारमुळे मी भारावून गेलो आहे. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही. यामुळे मी आमदार, खासदार, मंत्री होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, कार्यकर्त्यांचे व मतदारांचे प्रेम, आशीर्वादामुळे मी इथपर्यंत मजल मारली, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर सिल्लोड शहरात रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांचा बुधवारी  नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

पुढे बोलताना दानवे म्हणाले, सिल्लोड-भोकरदनला रेल्वेमंत्रिपद मिळाले त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. या मंत्रालयाचा व्याप मोठा असल्याने मला पहिल्यासारखे मतदारसंघात फिरता येणार नाहीत. त्यामुळे मतदारांनी कार्यकर्त्यांनी आपाआपली गावे सांभाळावी भाजपाचे विचार आणि कार्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावे. 

यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, माजी सभापती अशोक गरुड, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी चेअरमन श्रीरंग साळवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जैस्वाल, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, विनोद मंडलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप दाणेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, सरला बनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पाताई काळे, पंचायत समिती सदस्य अनिल खरात, गणेश बनकर, विलास पाटील, किरण पवार, मनोज मोरेल्लू, विनोद मंडलेचा, विजय वानखेडे, किशोर गवळे, मधुकर राऊत यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा