शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मी तुमच्याशीच एकनिष्ठ आहे हो..! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतले जात आहेत प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:55 IST

खरी शिवसेना नेमकी कुणाची; याविषयी कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून १०० रुपयांच्या बॉण्डपेपरवर नोटरी करून पक्षनिष्ठेविषयी शपथपत्र लिहून घेतले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडेल, अशी चर्चा होती. मात्र सामान्य शिवसैनिक शिवसेना पक्षासोबत राहिल्याने बंडखोर आमदारांसोबत बोटावर मोजता येतील, एवढेच लोक गेले. एकनाथ शिंदे यांच्यासह त्याच्यासोबत गेलेल्या आमदारांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. यामुळे खरी शिवसेना नेमकी कुणाची; याविषयी कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईत जाऊन मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. एवढेच नव्हे तर शहरातील गटप्रमुख, सहगटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर नोटरी करून शपथपत्र लिहून घेतले जात आहे.

काय आहेत शपथपत्रातील मजकूर?‘माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वावर अढळ निष्ठा आहे. प्रतिज्ञापत्रात असेही नमूद आहे की, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. आणि या निष्ठेची पुनश्च: पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे. प्रतिज्ञापत्रातील मजकूर सत्य आणि बरोबर आहे. त्यातील कोणतीही माहिती असत्य नाही. तसेच कोणतीही सत्यस्थिती लपविण्यात आलेली नाही.’

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे