शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हायब्रीड लसूण दिसायलाच देखणा, तर गावरान लसणाची चव न्यारी किंमत भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 18:25 IST

garlic farming: हायब्रीड लसूण दिसण्यास चांगला आणि स्वस्तही असल्याने अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होतात.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : हिवाळ्यात जास्त लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देत असतात. कारण, लसूण खाल्ल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बाजारात मात्र लसून ५० ते २०० रुपये किलोदरम्यान मिळत आहे. मग नक्की कोणता लसूण खरेदी करावा, असा संभ्रम नवग्राहकांना पडतो. मात्र, हायब्रीड लसूण दिसण्यास चांगला आणि स्वस्तही असल्याने अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. पण गावरान लसणाची ( garlic farming ) चव हायब्रीडला येत नाही. महाग असला तरी गावरान लसणाची चव न्यारी असल्याने त्याची किंमतही भारीच असते.

गावरान २००, हायब्रीड १३० रुपये किलोहायब्रीड लसूण १३० रुपये किलोने विकली जात आहे. मात्र, हायब्रीडपेक्षा गावरान लसूण चांगला असल्याचे व उत्पादनही कमी असल्याने हा लसूण २०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नवीन लसणाची आवक सुरु होईल तेव्हा भाव कमी होतील.

परराज्यातून येतोय हायब्रीड लसूणजाधववाडी कृउबा समितीच्या आडत बाजारात हायब्रीड लसूण सुरत, अहमदाबाद, इंदूर या महानगरांतून आणला जातो. तर गावरान लसूण गणोरी, फुलंब्री, भालगाव, आपतगाव तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर आदी ग्रामीण भागातून येतो.

मागणी गावरानलाचहायब्रीड लसूण स्वस्त असला तरी ग्राहक गावरान लसूण आवर्जून खरेदी करतात. कारण गावरान लसणाची चव अधिक चांगली असते. अनेक ग्राहकांना गावरान व हायब्रीड लसणातील फरक कळत नाही. डॉक्टरांनी सांगितले गावरान लसून खा. तोच लसून द्या, असे ग्राहक सांगत असतात. फोडणी देताना गावरान लसणाचा सुगंध दरवळतो, तसा हायब्रीड लसणाचा सुगंध कमी येतो.- रोहिणी पुंड, भाजी विक्रेता

वर्षभरातील तेजी-मंदी (किलो)महिना -- गावरान -- हायब्रीडजानेवारी ५०-८० रु ३०-५० रुफेब्रुवारी ५०-८० रु ३०-५० रुमार्च ५०-८० रु ३०-५० रुएप्रिल ६०-९० रु ४०-६० रुमे ६०-९० रु ४०-६० रुजून ९०-१०० रु ५०- ७० रुजुलै १००- १५० रु ५०-१०० रुऑगस्ट १३०- १८०रु ५०- १४० रुसप्टेंबर १५०-२०० रु ५०- १५० रुऑक्टोबर १५०-२०० रु ५०-१५० रुनोव्हेंबर १५०-२०० रु ५०-१३० रुडिसेंबर १५०-२०० रु ५०-१३० रु

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी