शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनेच सुपारी देऊन काढला पतीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:54 IST

सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी रात्री जितेंद्र नारायण होळकर या बँक अधिकाºयाचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात शहर गुन्हे शाखा पोलिसांना २४ तासांत यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी रात्री जितेंद्र नारायण होळकर या बँक अधिकाºयाचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात शहर गुन्हे शाखा पोलिसांना २४ तासांत यश आले. चारित्र्यावर संशय घेऊन पती उठता-बसता शिवीगाळ करून अपमान करीत असल्याच्या रागातून पत्नीनेच २ लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी होळकर यांच्या पत्नीसह सुपारी देणारा मध्यस्थ आणि दोन मारेकºयांना अटक केली.मृताची पत्नी तथा मुख्य आरोपी भाग्यश्री जितेंद्र होळकर (३८, रा. छत्रपतीनगर), मध्यस्थ शिवसेना कार्यकर्ता किरण काशीनाथ गणोरे (रा. नारळीबाग), मारेकरी शेख तौसिफ शेख इब्राहिम (२६, रा. जुनाबाजार) आणि शेख हुसेन ऊर्फ बाबू शेख बशीर (२६, रा.आजीम कॉलनी, जुनाबाजार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे आणि उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन खुनाचे गूढ उकलले. ते म्हणाले, जितेंद्र होळकर हे पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून पती-पत्नीत सतत भांडण होई. बºयाचदा मुलगा आणि मुलींसमोर पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत पानउतारा करतो, याचा तिला प्रचंड राग येई. ही बाब ती ओळखीचा शिवसेना कार्यकर्ता किरण गणोरे यास सांगायची आणि या त्रासातून मुक्त करण्यासाठी काहीतरी कर, अशी विनंती त्यास करायची. किरणने तिला मदत करण्याची तयारी दर्शविली. या कामासाठी दोन-तीन महिन्यांपूर्वी तिने त्यास दहा हजार रुपयेही दिले होते. तेव्हापासून ती सतत किरणला भेटून कामाचे काय झाले, असे विचारत होती. किरण हा सुपारी किलरच्या शोधात असताना त्याची भेट बेरोजगार तौसिफसोबत झाली. तौसिफला त्याने एका महिलेची तिच्या पतीच्या त्रासातून मुक्तता करायची असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने सुपारी घेतली. मात्र, त्याने ही बाब भाग्यश्रीच्या तोंडून ऐकल्यानंतरच हे काम करीन, असे तो किरणला म्हणाला. किरणने घटनेच्या चार दिवस आधी भाग्यश्रीला जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर बोलावून तौसिफची भेट करून दिली. तेथे भाग्यश्रीने आरोपीला जितेंद्रपासून सुटका करा, तुम्हाला २ लाख रुपये देईन, असे सांगितले. त्यानंतर तिने अ‍ॅडव्हान्स म्हणून आरोपींना देण्यासाठी किरणला १० हजार रुपये दिले. खुनानंतर उर्वरित १ लाख ९० हजार देण्याचे ठरले होते.स्पोर्टस् बाईकची मदतगुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात आणि निरीक्षक मधुकर सावंत यांनी खबºयाचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. खबºयांचे नेटवर्क हेच गुन्हे शाखेच्या आजच्या यशाचे गमक आहे.आरोपींनी गुन्ह्यात स्पोर्टस् बाईक वापरल्याचे छत्रपतीनगरातील सीसीटीव्हीत दिसले होते. आरोपी तौसिफ हा रात्री १० नंतर कधीही घराबाहेर पडत नाही. शुक्रवारी रात्री तो ११.३० च्या सुमारास स्पोर्टस् बाईकवरून तो बाहेर गेला आणि रात्री ३ च्या सुमारास घरी आला. त्यानंतर सकाळपर्यंत त्याच्या घरासमोर ही दुचाकी उभी होती. ही माहिती खबºयाने पोलिसांना दिली. चौकशीअंती तौसिफ आणि किरण हे चार ते पाच दिवसांपूर्वी होळकरच्या घरी गेले होते, अशी माहिती मिळाली. यामुळे संशयावरून पोलिसांनी गणोरेला त्याच्या घरातून रात्री उचलले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया किरणने गुन्ह्याची कबुली देऊन या खुनात आरोपी तौसिफ आणि भाग्यश्री यांच्यात मध्यस्थ असल्याचे सांगितले. भाग्यश्रीनेच सुपारी देऊन ही हत्या केल्याचे सांगितले.