शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२ लाखांची सुपारी देऊन पतीला संपवले; अनैतिक संबंधातात अडसर ठरल्याने पत्नीने बहिणीच्या मदतीने रचला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 18:01 IST

दिरासोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने रचला डाव

ठळक मुद्देपत्नी, मेहुणीसह ६ आरोपींना अटक स्थानिक गुन्हेशाखेने २४ तासात केला उलगडा

औरंगाबाद: चुलत दिरासोबत असलेल्या अनैतिक सबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा बहिणीमार्फत दोन लाख रुपये सुपारी ददेऊन काटा काढल्याची घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक येथे झाली. आरोपींनी सोमठाणा देविच्या डोंगरावर नेऊन खून केला आणि प्रेत थापटी तांडा शिवारात फेकून दिल्याचे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी मृताची पत्नी, मेहुणीसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

अशोक बाबासाहेब जाधव(रा.कडेठाण बु.) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी रंजना अशोक जाधव , मेहुणी मिनाबाई मंसाराम पठाडे(४०, रा.करंजगाव), संतोष सारंगधर पवार(४०), कारभारी उर्फ बापू एकनाथ घोलप (२५,रा. बदनापूर), अरुण शिवाजी नागरे (३५,रा. अकोला निकळक, ता. बदनापूर), प्रभाकर उर्फ शाम भिवसन तांबे (रा.अकोला निकळक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले की, रंजना हिचे तिचा चुलत दिर रामप्रसाद उर्फ बाळू शिवाजी जाधव सोबत अनैतिक सबंध होते. त्यांच्या दोघांत मोबाईलवर झालेल्या संवादाची रेकॉर्डिंग अशोक यांनी ऐकली. यामुळे पती पत्नीत महिनाभरापूर्वी भांडण झाले होते. पती भांडल्याचा राग रंजना हिला आला होता. यामुळे तिने तिची बहीण मिनाबाई हिला अशोकचा काटा काढ त्यासाठी तुला शेतमाल आणि दागिने विकून दोन लाख रुपये देते असे सांगितले.

यानंतर मिना हिने गावातील संतोष पवार याला अशोकला मारण्याची सुपारी दिली. १७ हजार रुपये आगाऊ रक्कम दिली. यानंतर त्यांनी कट रचल्यानुसार मिनाबाईने अशोकला फोन करून करंजगाव येथे १९ मे रोजी बोलावून घेतले. त्यांच्यातही अनेक वर्षापासून अनैतिक सबंध असल्यामुळे अशोक तिच्या घरी आला. ठरल्याप्रमाणे मिना ही अशोकला घेऊन सोमठाणा देवीच्या डोंगरावर गेली. तेथे संतोष हा त्याचे साथीदार घोलप, नागरे आणि तांबे यांच्यासह हजर होते. तेथे भांडण करून आरोपींनी अशोकला गळा आवळून मारून टाकले. यानंतर अशोकच्याच दुचाकीवरुन संतोषने मिनाबाईला गावात नेऊन सोडले. त्यानंतर ती दुचाकी एका ठिकाणी रस्त्यावर टाकून दिली. दरम्यान, अन्य आरोपींनी कारमधून मयत अशोकचे प्रेत थापटी शिवारातील रस्त्यालगत बेवारस अवस्थेत टाकून दिले. दुसऱ्या दिवशी हे प्रेत आढळून आल्यावर अशोकचा मुलगा ज्ञानेश्वर यांनी पाचोड ठाण्यात खूनाची तक्रार नोंदविली. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रेताविषयी माहिती मिळताच त्यांनी तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपीना अटक केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू