शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा काटा काढणाऱ्या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 19:40 IST

आशाबाई यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने तीन ते चार वेळा वार केलेले होते.

बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कुºहाडीने वार करुन खून करणाऱ्या पतीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.

वसंत गुणाजी काळे (५५, रा. कुंडी, ता. धारुर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, आशाबाई असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्या घराशेजारीच चुलते भाऊराव बाबुराव काळे (रा. कुंडी)  हे राहतात. १५ मार्च २०१७ रोजी दुपारी २.३० वाजता  वसंतची मुलगी राधा ज्ञानोबा भांड ही रडत घरातून बाहेर आली. यावेळी भाऊरावांनी तिला रडण्याचे कारण विचारले. यावेळी राधा म्हणाली, माझे वडील वसंत हे आता घरी आले होते. तुझ्या आईस मारुन टाकले आहे मला दोन भाकरी बांधून दे असे म्हणत भाकरी घेऊन ते निघून गेले. त्यानंतर पाऊस सुरु झाला. अर्ध्या तासानंतर पावसाने उघडीप दिली. यावर भाऊराव काळे यांनी गावातील काही मुलांना वसंतचा शोध घेण्यासाठी पाठविले.

यावेळी आशाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आशाबाई यांच्या गळ्यावर कुºहाडीने तीन ते चार वेळा वार केलेले होते. त्यानंतर भाऊराव यांच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात वसंत काळेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सिरसाळा ठाण्याचे सपोनि एच. बी. बोराडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र ३ जून २०१७ रोजी  न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासले. यात मुलगी राधा भांड, मुलगा माणिक काळे, पंच, साक्षीदार, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आलेल्या पुराव्यावरुन अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. वाघमारे यांनी वसंतला भादंवि कायद्याचे कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवत जन्मठेप व ५ हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने वरिष्ठ सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील आर. ए. वाघमारे, पैरवी अधिकारी जे. एस. वाव्हळकर यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंग