शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

तंबाखू विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 9:05 PM

तंबाखूची पुडी विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात मुसळ घातले.

औरंगाबाद : तंबाखूची पुडी विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात मुसळ घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला एकटेच सोडून पती ज्ञानेश्वर वाघ फरार झाला. ही घटना औरंगाबाद शहरातील ब्रिजवाडी येथे घडली आहे.

ब्रिजवाडी या कामगार वस्तीत राहणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ (३१) याने मंगळवारी (दि.१३) रात्री गायछाप विकत घेण्यासाठी पत्नी जयश्री वाघ (२७) हिला पैसे मागितले. कामधंदा न करता घरात बसून राहणाऱ्या दारूड्या पतीला जयश्रीने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या ज्ञानेश्वरने जयश्रीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पत्नी पैसे देत नसल्याने संतापलेल्या ज्ञानेश्वरने शेजारी पडलेली मुसळ उचलून जयश्रीच्या डोक्यात घातली.

एकाच फटक्यात जयश्री खाली पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागले. पत्नीला रक्ताच्या थारोळ्या सोडून ज्ञानेश्वरने तिथून पोबारा केला.दोन मुलांची आई असलेली जयश्रीची मुले तेव्हा बाहेर खेळत होती. मुले घरात आल्यानंतर आई रक्ताच्या थारोळ्या पडलेली पाहून मुलांनी आरडाओरड केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी जयश्रीला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस