शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:10 IST

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे.

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राजकीय रान उठविले असून त्या पार्श्वभूमीवर येथे १ मे रोजी आयोजित केलेल्या जाहीर सभेवरून निर्माण झालेल्या वादंगाने बुधवारी वावटळीचे रूप धारण केले. सभा घेऊ नये यासाठी येणाऱ्या निवेदनांची संख्या वाढत असतानाच मनसे पदाधिकारी मात्र सभा घेण्यावर ठाम आहेत.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे. ठाकरेंची सभा आणि वाढता विरोध यामुळे प्रशासनाची कोंडी होत असून, पोलीस प्रशासनाने सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही.  मंगळवारी चार ते पाच संघटनांनी निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतर बुधवारी अ. भा. सेनेचे महेंद्र साळवे, सतीश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. सामाजिक शांतता भंग होईल, असा सभेचा उद्देश नसून ही जागरण सभा आहे. सभेमुळे कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही, असा दावा धोत्रे यांनी केला. 

...तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी दिल्यास भारिप तथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा नेते सुमित भुईगळ यांनी दिला आहे.

काय लिहिले आहे ‘त्या’ होर्डिंग्जवर?शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्या दौऱ्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्टूनमधून केलेला प्रहार बुधवारी त्यांच्याच विरोधात होर्डिंग्ज रूपाने निराला बाजारमध्ये झळकाविण्यात आला असून त्यावरून चर्चेचे पेव फुटले आहे.

हे होर्डिंग्ज राज यांच्या विरोधात आहे. त्यावर असा मजकूर लिहिलेला आहे की, अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्रीराम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असा मजकूर होर्डिंग्जवर आहे. हे होर्डिंग्ज कुणी लावले, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादMNSमनसे