शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गावी जाण्याचे त्रांगडे कायम; ई-पास मिळविण्यात २० हजार नागरिक नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:45 IST

पोलीस आयुक्तालयाकडे प्राप्त झाले परप्रांतीय कामगारांचे ३९ हजार ५९१ अर्ज

ठळक मुद्दे२० हजार ४३८ अर्ज बाद करण्यात आले आहेत.१५ हजार ५०६ अर्जदारांना बाहेरगावी जाण्याचा ई-पास दिलाविविध जिल्ह्यांनी  नाकारला नागरिकांना प्रवेश 

औरंगाबाद : बाहेरगावी जाण्यासाठी आॅनलाईन ई-पास मिळविण्यासाठी तब्बल ३९ हजार ५१५ अर्ज पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले. यापैकी सुमारे  २० हजार ४३८ नागरिकांना  अर्जातील त्रुटींमुळे ई-पास नाकारण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ मार्चपासून  लॉकडाऊन सुरू आहे. नोकरी, धंदा आणि शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात आलेले हजारो नागरिक अडकून पडले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ मेपासून औरंगाबाद शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना आॅनलाईन आणि आॅफलाईन  अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने उपलब्ध केलेल्या ई-मेलवर आजपर्यंत ३९ हजार ५१५  आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. आॅनलाईन अर्ज सादर करताना नियमावलीनुसार शारीरिकदृष्ट्या प्रवासासाठी तंदुरुस्त आहे  आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडणे, ज्या वाहनाने प्रवास करणार आहात  त्याचा नोंदणी क्रमांक, शिवाय प्रवाशांचे आधारकार्ड जोडणे गरजेचे आहे. 

औरंगाबाद शहरात आणि औद्योगिक वसाहतीत हजारो परप्रांतीय कामगार, मजूर कार्यरत आहेत. ही मंडळीही आता त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आॅनलाईन अर्ज करीत आहेत. ग्रुप लीडरमार्फत त्यांना अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर सर्वांचे स्वतंत्र वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी सर्वांची नावे असलेले एकच प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आॅनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध झाल्यापासून आजपर्यंत तब्बल ३९ हजार ५१५ अर्ज पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले. सुमारे ८० ते ९० हजार नागरिकांचे हे एकत्रित अर्ज आहेत. एका अर्जावर ५० ते ६० लोकांचा ग्रुप आहे. अर्जातील  चुका आणि त्रुटींमुळे निम्म्याहून अधिक अर्थात २० हजार ४३८ अर्ज बाद करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने आजपर्यंत १५ हजार ५०६ अर्जदारांना बाहेरगावी जाण्याचा ई-पास दिला आहे.

विविध जिल्ह्यांनी  नाकारला नागरिकांना प्रवेश राज्यातील नवी मुंबई, लातूर, ठाणे, परभणी, सोलापूर आणि पिंपरी चिंचवड आदी जिल्हा प्रशासनाने पत्र पाठवून रेड झोनमधील नागरिक, कोविड-१९ ची लक्षणे असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. .......

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस