शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! शिकारीसाठी बिबट्या झाडावर चढला अन अडकून गतप्राण झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 17:42 IST

leopard dies on tree while hunting: झाडावर चढून बिबट्या वन्यप्राण्यांवर हल्ला चढवीत असतो. त्याच उद्देशाने आमदाबाद शिवारात मृतावस्थेत असलेला बिबट्यादेखील आला असावा

नाचनवेल ( औरंगाबाद ) : आमदाबाद (ता. कन्नड) शिवारातील मंगलसिंग राजपूत यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृत झालेला बिबट्या आढळून ( leopard dies on tree while hunting ) आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचामृत्यू कसा झाला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊनसुद्धा ते बुधवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी आले नव्हते.

आमदाबाद शिवारातील शेतकरी बुधवारी नेहमीप्रमाणे शेतकामासाठी आले असता दुपारच्या सुमारास अचानक वन्यप्राण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. तेव्हा शेतकऱ्यांच्या आवाजाने राजपूत यांच्या शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या दुसऱ्या एका बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेदरम्यान काही शेतकऱ्यांना त्याच झाडावर अन्य एक बिबट्या लटकलेला अवस्थेत दिसला. काही शेतकरी प्रसंगावधान राखत झाडाजवळ गेले असता त्यांना तो मृतावस्थेत आढळून आला. साधारण दोन दिवसांपासून तरी तो लटकलेला असावा, अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. काही शेतकऱ्यांनी या संदर्भात कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी भिसे यांना फोनवरून माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आले नव्हते.

शिकारीच्या शोधात आला...वन्यप्राण्यांना जंगलात खाद्य मिळत नसल्याने ते शेतवस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे नागरी वसाहतीत बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. झाडावर चढून बिबट्या वन्यप्राण्यांवर हल्ला चढवीत असतो. त्याच उद्देशाने आमदाबाद शिवारात मृतावस्थेत असलेला बिबट्यादेखील आला असावा; परंतु तो झाडाच्या फादीत बसल्याने त्याला खाली उतरता न आल्याने अखेर त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला.

कायमच असतो वन्यप्राण्यांचा वावरगेल्या आठवड्यातच आमदाबाद शिवारातील शेतकरी पुंडलिक बनकर यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. पोलीस, वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने त्या बिबट्यास सुखरूप बाहेर काढले, तर बुधवारी पुन्हा एका बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे; तर दोन दिवसांपूर्वीच ट्रॅक्टरचालकांना शेतशिवारात बिबट्या दिसून आला होता. दरम्यान, नाचनवेल, आमदाबाद, आडगाव, मोहाडी हा परिसर वनक्षेत्रालगत असल्याने येथे वन्यप्राण्यांचा कायम वावर असतो.

टॅग्स :Deathमृत्यूleopardबिबट्याAurangabadऔरंगाबाद