शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 19:25 IST

मेसचे दर वाढले अन् पोळीही गायब! गॅस टंचाईचा फटका हजारो स्पर्धा परीक्षार्थींना; विद्यार्थ्यांचा दाटून आला कंठ

- प्रशांत तेलवाडकर

छत्रपती संभाजीनगर : “मोठी स्वप्ने घेऊन घरापासून दूर आले. दिवसभर अभ्यास करते; पण आता जेवणाचीच चिंता लागली आहे. खानावळीत तीन दिवसांपासून खिचडीच मिळत आहे. त्यातही त्यांनी मासिक रक्कमही वाढविली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर गावाकडे परतावे लागेल,” असे बोलताना एका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनीचा कंठ दाटून आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या हजारो तरुण-तरुणींच्या मनातील ही वेदना आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, पोलिस भरती इ. स्पर्धा परीक्षांसाठी मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. हॉस्टेल किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये राहून ते दिवसरात्र अभ्यास करत असतात. त्यांचे रोजचे जेवण प्रामुख्याने खासगी खानावळींवर अवलंबून असते.मात्र, गॅसटंचाईमुळे अनेक खानावळींच्या स्वयंपाकघरावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी जेवणातील पदार्थ कमी झाले असून काही खानावळीत सलग तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांना खिचडीवरच समाधान मानावे लागत आहे. एवढेच नव्हे तर वाढत्या खर्चाचे कारण देत काही खानावळ मालकांनी मासिक शुल्कात वाढ केली आहे.

काही खानावळ मालकांनी गॅसटंचाई कायम राहिली तर २५ तारखेनंतर तुम्हाला जेवणाची वेगळी व्यवस्था करावी अशी सूचना दिल्याने क्रांती चौक, अजबनगर, नूतन कॉलनी, समर्थनगर, औरंगपुरा, स्टेशन रोड, बन्सीलालनगर, एन ६ परिसर, गुलमोहर कॉलनी, बीड बायपास, इ. भागातील विद्यार्थी चिंतित आहेत.

जेवणाची सोय नसेल तर अभ्यासात मन कसे लागणार?घरच्यांनी मोठ्या अपेक्षेने शहरात पाठवले आहे. स्पर्धा परीक्षा पास होऊन आयुष्य बदलायचे स्वप्न आहे. पण, जेवणाचीच सोय नसेल तर येथे राहून अभ्यास कसा करायचा?”-श्रृतिका आढाव, अकोला

अनेक जणी गावाकडे परतण्याच्या तयारीतया संकटामुळे आमच्या मैत्रिणी एप्रिलआधीच गावाकडे परतण्याची तयारी करीत आहेत.-अक्षरा थोरात, अहिल्यानगर

जेवणाचे २०० रुपयांनी मासिक दर वाढविलेखानावळी चालकांनी मासिक दर वाढविले. १५०० रुपये मागील महिन्यात आम्ही देत होतो. आता १७०० रुपये द्या, असे सांगण्यात आले. मुलांना २००० ऐवजी २२०० रुपये द्यावे लागतील.-स्नेहल फरकडे, अकोट,

अभ्यासापेक्षा जेवणाचे टेन्शनकाही खानावळीमध्ये खिचडीच देत आहेत. काही खानावळीत पोळी बंद केली तर काही खानावळीत दोन भाज्यांऐवजी एकच भाजी दिली जात आहे. किमतीही वाढविल्या आहेत. यामुळे अभ्यासापेक्षा जेवणाचेच टेंशन आले आहे.-जान्हवी तोटेवाड, नांदेड

English
हिंदी सारांश
Web Title : Gas shortage leaves competitive exam aspirants in hunger, facing 'khichdi'.

Web Summary : Gas shortage hits Aurangabad's canteens, forcing students preparing for competitive exams to eat only 'khichdi'. Rising costs and fears of canteen closures are pushing students towards financial strain and potentially forcing them to return home.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र