शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पैठणरोडवर उभ्या राहणाऱ्या शेकडो ट्रकमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:20 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : शहरात प्रवेश करण्यासाठी शेकडो जडवाहनांच्या लागतात रांगा

छत्रपती संभाजीनगर : जड वाहनांना रात्री नऊपर्यंत शहरात नो एंट्री आहे. असे असताना शहरात प्रवेश करण्यासाठी पैठण आणि लिंक रोडने येणाऱ्या शेकडो मालवाहतूक ट्रक रोज सायंकाळी महानुभाव आश्रम चौकापर्यंत येऊन थांबतात. या ट्रकमुळे रस्ता एकेरी होतो आणि शहरात येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एवढेच नव्हे, तर एकेरी रस्त्यामुळे तेथे अपघाताचीही शक्यता वर्तविली जाते, याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

शहरातील अपघात टाळण्यासाठी जड वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहेत. असे असताना मालवाहू वाहतूक करणारे ट्रकसह अन्य जडवाहनांचे चालक मनमानी करीत असल्याचे दिसून येते. शहरात रात्री नऊ वाजल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे, हे माहिती असूनही पैठण लिंकरोड आणि बिडकीनकडून येणारे शेकडो मालवाहू ट्रक रोज सायंकाळी महानुभाव आश्रम वाहतूक सिग्नलपर्यंत येऊन उभे राहतात. एकापाठोपाठ उभ्या राहणाऱ्या या ट्रकची रांग गुरूवारी लिंक रोडपर्यंत लागलेली होती.

या मार्गावरून सायंकाळी बिडकीन डीएमआयसीतील शेकडो कामगार, तसेच वाळूज एमआयडीसीतून कामगारांची ने-आण करणाऱ्या शेकडो बसेस आणि अन्य वाहने धावतात. पैठण, गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात नोकरीचे ठिकाणहून शहरात अप-डाऊन करणारे नोकरदारही याच मार्गाने सायंकाळी शहरात येतात. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या ट्रकमुळे हा दुहेरी मार्ग एकेरी बनतो. परिणामी तेथे वाहतूक कोंडी होते. बऱ्याचदा रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत अडकून पडते. या वाहनांना रात्री नऊ वाजल्यानंतर शहरात प्रवेश मिळणार असतो, यामुळे त्यांना लिंकरोडच्या पुढे शहरात का येऊ दिल्या जाते, असा प्रश्न यानिमित्ताने वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

कारवाई करण्यात आलीजडवाहनांना बायपासवर जाण्यास परवानगी आहे. मात्र, शहरात रात्री नऊपर्यंत प्रवेश नसतो. आज तेथे येऊन थांबलेली जड वाहनांमध्ये मका घेऊन रेल्वे मालधक्का येथे जायचे होते. यामुळे ही ट्रक महानुभाव आश्रम सिग्नलपर्यंत येऊन थांबली होती. रेल्वे येणार नसल्याचे त्यांना समजल्याने काही ट्रकचालक तेथून निघून गेले. उर्वरित ट्रकचालकांनाही आम्ही तेथून जाण्यास सांगितले आहे.-- विवेक जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर