शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील शेकडो प्राध्यापकांची पीएच.डी. गाईडशिप धोक्यात

By राम शिनगारे | Updated: April 4, 2024 18:39 IST

‘यूजीसी’च्या नियमांची अंमलबजावणी;पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पूर्णवेळ शिक्षकच राहणार गाईड

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदवी महाविद्यालयांतील शेकडो प्राध्यापकांची पीएच.डी. गाईडशिप धोक्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मान्यताप्राप्त प्राध्यापकांनाच पीएच.डी.चे मार्गदर्शक होता येईल, असे स्पष्ट केलेले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने ४ एप्रिल रोजी होणाऱ्या विद्यापरिषदेच्या बैठकीत हा विषय ठेवला आहे. तीत मंजुरी मिळाल्यावर ६ एप्रिल रोजी व्यवस्थापन परिषदेत हा विषय येणार आहे. दोन्ही बैठकांमध्ये मंजुरीनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल. यूजीसीने वर्षभरापूर्वी एक अधिसूचना काढून पीएच.डी.चे मार्गदर्शक होण्याविषयीची नियमावली जाहीर केली. या नियमानुसार विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पूर्णवेळ प्राध्यापकांना नियमानुसार पीएच.डी.चे मार्गदर्शक होता येईल. पदवी अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना गाईडशिप देता येणार नाही.

विद्यापीठ प्रशासन कोणाचीही गाईडशिप काढून घेणार नाही, मात्र, पदवी अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांकडे यापुढे पीएच.डी.चे विद्यार्थी देण्यात येणार नाहीत. त्यामुळे आपोआप संबंधितांची गाईडशिप विद्यार्थी नसल्यामुळे येत्या काळात संपुष्टात येणार आहे. यूजीसीच्या नियमानुसार विद्यापीठ प्रशासनाने त्याविषयीचे परिनियम तयार केले. या परिनियमांना विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी घ्यावी लागणार आहे. या दोन्ही सभागृहांत काही सदस्यांनी विरोध दर्शविला तरीही त्यास मंजुरी द्यावीच लागणार आहे. यूजीसीची नियमावली देशातील सर्व विद्यापीठांना बंधनकारक आहे.

इतर विद्यापीठांमध्ये नियम लागूराज्यातील बहुतांश अकृषी विद्यापीठांमध्ये पीएच.डी. गाईडशिपसंदर्भात यूजीसीने जाहीर केलेले नियम लागू झाले आहेत. हे नियम लागू न केल्यास पदवी महाविद्यालयात होणारे पीएच.डी.चे संशोधनच नियमबाह्य ठरणार आहे.

५ हजार संशोधक अन् १७०८ गाईडविद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांत तब्बल १ हजार ७०८ प्राध्यापक पीएच.डी.चे गाईड आहेत. या गाईडकडे ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी संशोधन करीत आहेत. या १ हजार ७०८ गाईडपैकी केवळ विद्यापीठातील विभाग व उपकेंद्रातील कार्यरत १५० प्राध्यापकांसह एम.एड., एम.फार्म., एम.ई., एम.ए., एम.एस्सी. आणि एम.कॉम. या अभ्यासक्रमांच्या पूर्णवेळ मान्यताप्राप्त प्राध्यापकांनाच नियमानुसार पीएच.डी.चे गाईड होता येणार आहे.

नियम लागू विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतर केली जाणार आहे. इतर विद्यापीठांमध्ये हा नियम लागू झालेला आहे.-डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण