शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:31 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करतील, असा विश्वास

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवारी शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. ठाकरे यांनी वारंवार शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त होतील, असा विश्वास असून ठाकरे तो शब्द पाळतील, असे वाटते आहे. 

शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी व काही कार्यकर्त्यांनी देखील बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, येणाऱ्या सरकारकडून त्यांनाही अपेक्षा आहेत. शिवाय ठाकरे कुटुंबियातून पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषविले जाणार आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता येईल, यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येईल. सिल्लोड, पैठण, फुलंब्रीतील शेतकऱ्यांनी स्वत:हून मुंबईला शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तयारी केली. उत्स्फूर्तपणे ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. 

आ. भुमरे, आ. सत्तार यांचे नाव चर्चेत जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार आहेत. त्यापैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैठणचे आ.संदीपान भुमरे यांचे नाव मंत्रिमंडळात वर्णी लागण्याबाबत आघाडीवर आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आ.अब्दुल सत्तार हे लॉबिंग करीत आहेत. इतर कुणाचेही नाव मंत्रिमंडळासाठी चर्चेत नाही. शपथविधी सोहळ्यात महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे दोन आमदार शपथ घेणार आहेत. ३ डिसेंबरनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतरच आघाडीतील सर्व घटक पक्षांतील मंत्र्यांची नावे समोर येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

पालकमंत्री मुंबईचाच असणार?औरंगाबादला पालकमंत्री मुंबईतूनच नेमण्यात येईल. ठाकरे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर पालकमंत्री नेमण्याबाबत आघाडीची संयुक्त बैठक होऊन निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. मागील पाच वर्षांत जिल्ह्याला जे पालकमंत्री मिळाले, ते सर्व मुंबईचेच होते. रामदास कदम, डॉ. दीपक सावंत आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही पालकमंत्री मुंबईचेच होते. यावेळीदेखील पालकमंत्री मुंबईचाच असेल, असे बोलले जात आहे. 

औरंगाबाद सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक शपथविधीला रवानाउद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमाला औरंगाबाद शहरातील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महापालिकेतील पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.  महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मुंबईला बुधवारी रात्रीच रवाना झाले. अनेक जण गुरुवारी सकाळी मुंबईकडे निघणार आहेत.मागील एक महिन्यापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोट बांधली. मुख्यमंत्री म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा आयोजित केला आहे. औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनेक जण बुधवारी सायंकाळी रवाना झाले. काही जण उद्या सकाळी वाहनाने निघणार आहेत. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले होते. २००० पर्यंत हे सरकार होते. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड आनंदी आहेत. शपथविधी सोहळ्याला न जाणारे कार्यकर्ते शहरातच थांबून जल्लोष साजरा करणार आहेत. जल्लोषात काँग्रेस-राष्टÑवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसFarmerशेतकरी