शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

शेकडो दिंड्यांची पैठणकडे आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:44 IST

नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून वारकºयांच्या शेकडो पायी दिंड्यांनी पैठणकडे आगेकूच केली आहे. शेकडो दिंड्यातील लाखो वारकरी दिंड्यांसह विविध मार्गांनी सोमवारी पैठणपासून काही अंतरावर विसावले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून वारकºयांच्या शेकडो पायी दिंड्यांनी पैठणकडे आगेकूच केली आहे. शेकडो दिंड्यातील लाखो वारकरी दिंड्यांसह विविध मार्गांनी सोमवारी पैठणपासून काही अंतरावर विसावले आहेत. दिंडी मुक्कामी असलेल्या गावात ग्रामस्थ भक्तीभावाने वारकºयांचे स्वागत करत असल्याचे चित्र गावागावांतून दिसून येत आहे. मंगळवारी दुपारनंतर हरिनामाच्या गजरात या दिंड्या पैठण शहरात दाखल होणार आहेत.दिंड्या रस्त्याने मार्गस्थ असताना पैठण शहरात या दिंड्याच्या राहुट्या उभारण्याचे काम सोमवारी गोदावरीच्या वाळवंटासह शहरभर सुरू होते. व्यापाºयांनी आज यात्रा मैदान परिसरात दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात पंढरपूरनंतर वारकरी संप्रदायाची दुसºया क्रमांकाची यात्रा म्हणून नाथषष्ठीला मान आहे. नाथषष्ठी सोहळ्यासाठी यंदा पाच ते सहा लाख वारकरी व भाविक नाथनगरीत येण्याचा अंदाज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी व्यक्त केला आहे.जिल्हाधिकाºयांचे बारीक लक्षनाथषष्ठीला येणाºया भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जातीने लक्ष घातले असून आढावा बैठक घेऊन त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस विविध सूचना दिल्या आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडून यात्रा सुविधा कामांबाबत जिल्हाधिकारी रोज आढावा घेत आहेत. यात्रा महोत्सवाची प्रशासनाकडून जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी दिली.पैठणमधील रस्ते, नाल्या चकाचकशहरातील संपूर्ण रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे. शहरामधील मुख्य नाल्यांची साफसफाई तीन जेसीबी मशिन, सहा ट्रॅक्टर या कामासाठी लावण्यात आले आहेत. भाविकांना तात्काळ मदत करण्यासाठी आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली असून तीन कर्मचाºयांचे पथक चोवीस तास तैनात ठेवण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून सा.बां.चे उपअभियंता बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाथषष्ठी सोहळयाच्या स्वच्छतेसाठी प्रशासनातर्फे दोनशे हंगामी कर्मचाºयांची भरती करण्यात आली आहे. हे पथक तीन सत्रात काम करणार आहे. या सर्व उपाययोजनांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली.न.प.चे कार्यालय यात्रा मैदानातनाथ मंदिराच्या कमानीजवळ न.प.चे कार्यालय उभारण्यात आले असून भाविकांच्या अडीअडचणी येथूनच सोडविण्यात येत आहे. भाविकांनी या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष सूरज लोळगे व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केले आहे.दिंड्यांना फडावरच मिळणार पाणीनाथषष्ठी सोहळयासाठी जवळपास सहाशे दिंड्यांची नोंद नगर परिषद प्रशासनाकडे झाली आहे. या दिंड्यातील वारकºयांना पिण्याचे स्वच्छ पाणी स्टँड पोस्टद्वारे फडावरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सरकारी दवाखाना, वाळवंट परिसर, नाथसागर धरणाच्या परिसरातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात १६ टँकर प्रशासनाने उपलब्ध केले असून यात्रेकरुंना व भाविकांना शौचालयासाठी ३०० शौचालयाचे खड्डे खोदण्यात आली आहेत. गोदा वाळवंट परिसरामधील गीता मंदिर, दक्षिण काशी मैदान, नाथ मंदिर परिसर, कावसनकर स्टेडियम आदी ठिकाणी मोठे ६ विद्युत हायमास्ट बसविण्यात आले आहेत.प्रशासकीय तयारीबाबत माहिती देताना मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले की, न.प. तर्फे संपूर्ण नाथषष्ठी यात्रा परिसर व शहराच्या विविध भागात ३ ड्रोन कॅमेरे, १० वॉकीटॉकी, १६ सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.४ही यंत्रणा नाथ मंदिर, गोदाकाठ परिसर, गागाभट्ट चौक, शिवाजी चौक, खंडोबा चौक अशा भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात येणार असून पोलीस विभागाची यावर करडी नजर राहणार आहे. काल्याच्या दिवशी तीन स्क्रीन पडद्याद्वारे दहीहंडी फोडण्याचा सोहळा भाविकांसाठी प्रक्षेपित केला जाणार आहे.नाथषष्ठी सोहळ्याचे वेळापत्रकश्री संत एकनाथ षष्ठी -७ मार्च २०१८ -सकाळी ७ वाजता वारकरी पूजन, दुपारी १२.३० वाजता नाथ वंशजांच्या निर्याण दिंडीचे अर्थात मानाच्या पहिल्या दिंडीचे समाधी मंदिराकडे प्रस्थान, दुपारी २.३० वाजता हरिदासी व वारकरी कीर्तन, रात्री ७ वाजता हरिपाठ४सप्तमी छबिना - ८ मार्च -सकाळी ११ वाजता श्री एकनाथ महाराज पादुका पूजन, दुपारी १२ वा उपदेश, अनुग्रह प्रदान सोहळा, दुपारी १ नंतर महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री १ वाजता श्री भय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या वाड्यातील नाथ पादुकांची पारंपरिक मार्गे छबिना मिरवणूक.४श्री संत एकनाथ महाराजांच्या दोन पादुका अस्तित्वात असून, एक जोड हा गावातील नाथ मंदिरात असून तो केवळ पंढरपूरच्या वारीच्या वेळीच लोकदर्शनार्थ सव्वा महिना प्रवासात असतो. दुसरा जोड हा नाथवंशज वै. ह.भ.प. श्री भय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या चारही मुलांकडे वाड्यात असून पादुकांचा हा जोड वर्षातून केवळ एकदाच फाल्गुन वद्य सप्तमीला पैठणमध्ये दर्शनार्थ मिरविल्या जातो. इतरवेळी या दोनही पादुका त्याचे पावित्र्य जपत देवघरामध्ये ठेवण्याची परंपरा चालत आलेली आहे.४अष्टमी काला - ९ मार्च -सकाळी ६ वाजता वाळवंटमार्गे नाथ पादुकांचे गावातील नाथ मंदिरात आगमन, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता नाथ वंशजांच्या काला दिंडीचे समाधी मंदिराकडे प्रस्थान, सूर्यास्तासमयी दहीहंडी.नाथषष्ठीवर अवकाळी पावसाचे सावटनाथषष्ठी सोहळ्यावर अवकाळी पावसाचे सावट पसरले असून येणाºया वारकरी, भाविक व व्यापाºयांच्या मनात धडकी भरली आहे. हवामान खात्याचा संभाव्य इशारा लक्षात घेता प्रशासनाने वारकरी भाविकांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था राखून ठेवणे गरजेचे आहे. दोन वर्षापूर्वी अचानक झालेल्या पावसाने नाथषष्ठीला आलेल्या वारकºयांना झोडपून काढले होते. या पावसात वारकºयांचे व प्रशासनाचे मोठे हाल झाले होते. हा पूर्वानुभाव लक्षात घेता यंदा प्रशासनाने वेधशाळेचे भाकीत लक्षात घेता यात्रा नियोजनात या बाबीचा समावेश करावा, अशी मागणी होत आहे.