शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिडको-हडकोत कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:16 IST

शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून सिडको-हडको आणि चिकलठाणा परिसरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून सिडको-हडको आणि चिकलठाणा परिसरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत आहे. सिडको एन-५ येथे मनपाने कोणताही फारसा खर्च न करता कच-यावर दर्जेदार प्रक्रिया केली आहे. हीच पद्धत शहरातील विविध वॉर्डांमध्ये आत्मसात केल्यास कच-याचा प्रश्न सुटेल.महापालिकेने कचराकोंडी सुटावी म्हणून तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून कंपोस्ट पीट तयार केले. या कचरा पीटचा काहीच उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. मग मनपाने कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४३० पैकी १७० कच-याचे पीट यापुढे उभारण्यात येऊ नयेत, असे आदेश महापौरांनी दोन दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला दिले आहेत. सिडको-हडको भागात वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवानांनी मिळून अल्प खर्चात कंपोस्ट पीट तयार केले आहेत. एन-५ कम्युनिटी सेंटर येथे लोखंडी जाळीत दररोज ओला कचरा टाकण्यात येत आहे. या कचºयात शेण, पालापाचोळा टाकण्यात येतो. अवघ्या २० ते २२ दिवसांमध्ये दर्जेदार खत तयार होत आहे. विशेष बाब म्हणजे परिसरात या कंपोस्ट पिटाची फारशी दुर्गंधीही येत नाही. कमी खर्चात हा प्रयोग यशस्वी होत असल्याने मनपा सर्वत्र हीच पद्धत का अवलंबत नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांनी अशाच पद्धतीचाप्रयोग यशस्वी करून दाखविलाआहे.जुन्या शहरात प्रत्येक चौकात कच-याचे ढीग दिसून येत आहेत. या भागात डोअर टू डोअर कलेक्शन यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. शंभर टक्के कलेक्शन झाल्यास नागरिक चौकात कशासाठी कचरा आणून टाकतील...? मनपाने प्रत्येक वॉर्डात दोन रिक्षा लावल्या आहेत. या रिक्षा कधी येतात आणि कधी जातात हे कोणालाच माहीत नाही. नगरसेवकही फारसे लक्ष देत नाहीत. अनेक भागांत तर निव्वळ कचरा जाळण्याचे प्रकार मनपा कर्मचारीच करीत आहेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका