शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'नम्र विनंती आहे की, आमच्या शाळा बंद करू नका'; झेडपी विद्यार्थ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By राम शिनगारे | Updated: October 10, 2023 13:18 IST

जि. प. शाळांसाठी आसेगावच्या चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जि. प.च्या शाळा बंद करून इतर शाळांना विद्यार्थी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विविध क्षेत्रांतून विरोध होत असताना गंगापूर तालुक्यातील आसेगाव याथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा वाचविण्याचे साकडे घातले. निमित्त होते ९ ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनाचे. ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं...’ या जुन्या खेळानुसार खरंच हे पत्र काळाच्या ओघात हरवले आहे.

तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यापासून पोस्टकार्डचा वापर जवळपास बंदच झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, पत्र याविषयीची माहितीच नाही. त्यामुळे जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आसेगाव जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. त्या पत्रात, 'साहेब, आपण कमी पोरं असणाऱ्या शाळा बंद करणार आहात. जर या शाळा बंद झाल्या, तर माझ्यासारख्याच त्या शाळांतील मुलांच्या शिकण्याचं काय होईल? म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की, या शाळा बंद करू नका. जर या शाळा बंद झाल्याच तर तिथल्या पोरांना दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यातील छातीपर्यंतच्या पाण्यातून कसे जायचे? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, या शाळा बंद करू नका,’ असा मजकूर लिहिण्यात आला. त्यातून संवेदनशीलताही जपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वर्गशिक्षिका गीतांजली साळुंके-हिवाळे यांनी दिली.

‘हरवलेले’ पत्र शोधण्याचा प्रयत्नभावनांनी ओथंबलेले, ‘हरवलेले’ पत्र शोधण्याचा प्रयत्न वडगाव-कोल्हाटी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. मुख्याध्यापक सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, अनिता राठोड, मंगल गाडेकर, विद्या सोनोने, रिता मार्कंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी पत्र लिहून भावना व्यक्त केल्या.

पत्रलेखन कसे करावे, याचे प्रात्यक्षिकशहरातील पदमपुरा भागातील महात्मा फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पत्र लेखनाची माहिती दिली. हा उपक्रम मुख्याध्यापक प्रसाद गुंड, कला शिक्षक दिलीप वाढे यांनी राबविला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण