शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माणसं मरताहेत ? आम्हाला काय...; पडेगाव रोडबाबत सारेच गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:49 IST

या अरुंद रस्त्यावर माणसांचे मृत्यू होत असताना बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्वजण गप्पच आहेत. 

ठळक मुद्दे वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रोडला मृत्यूचा सापळा म्हटले जायचे. आता पडेगाव रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा दुपटीने जखमी झाले.

औरंगाबाद : वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रोडला मृत्यूचा सापळा म्हटले जायचे. आता पडेगाव रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा दुपटीने जखमी झाले. या अरुंद रस्त्यावर माणसांचे मृत्यू होत असताना बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्वजण गप्पच आहेत. 

अहमदनगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी मागील वीस वर्षांपासून होत आहे. या वीस वर्षांच्या काळात पडेगाव परिसरात वसाहती वाढल्या. शाळा, हॉटेल आणि इतर व्यवसायही वाढले. रस्त्यावरील वाहनांची संख्याही वीस वर्षांत दहा पटीने अधिक झाली. मात्र, हा रस्ता रुंद न झाल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. 

गेल्या तीन वर्षांत नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट या दरम्यानच्या रस्त्यावर सुमारे ७० बळी गेले आहेत. यामधील बहुतांश बळी हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, महापालिका आणि लोकप्रतिनिधी सारेच गप्प असल्याने या मृत्यूच्या सापळ्यातून नागरिकांची सुटका होणार नाही, असेच चित्र आहे. 

२०१४ साली या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, या विषयाकडे बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्षच केले, तर हा विषय राजकीय नेत्यांच्या चर्चेतही येत नाही, इतके त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेलची संख्या वाढल्याने रस्त्यावर उभ्या राहणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. वाहतूक पोलीस ही वाहने हटविताना दिसत नाही. 

पर्यायी रस्त्यांची कामे कधी?नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतच्या रस्त्याला पर्यायी असे दोन रस्ते  विकास आराखड्यात आहेत. एका रस्त्याचे ९० टक्के भूसंपादन झालेले आहे. भूसंपादन झालेल्या रस्त्यावर मनपाने कच्चा रस्ता जरी तयार केला तरी निम्मी वाहतूक त्या रस्त्यावर वळेल. वैजापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाणार्‍या या रस्त्यांची कामे लवकरात लवकर झाल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीMuncipal Corporationनगर पालिका