शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

प्रचंड भाववाढ! खिसा गरम असेल तरच वार्षिक धान्य खरेदीस जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:15 IST

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धान्य, तांदळाचे भाव वाढले आहेत. यामुळे तुम्हाला बजेटही वाढवावे लागणार आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : काय तुम्ही वार्षिक धान्य खरेदी करण्याचा विचार करीत आहात..? मग जरा थांबा. कारण, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धान्य, तांदळाचे भाव वाढले आहेत. यामुळे तुम्हाला बजेटही वाढवावे लागणार आहे. खिसा गरम ठेवूनच तुम्हाला धान्य खरेदीसाठी जावे लागेल.

मध्य प्रदेश-राजस्थानचा नवीन गहू बाजारातऔरंगाबाद जिल्ह्यात एकूण विक्री होणाऱ्या गव्हापैकी ६०-७० टक्के गहू मध्य प्रदेशातील असतो. मध्य प्रदेशचा मिनी शरबती २६०० ते ३१०० रुपये, राजस्थानचा गहू २७०० ते २८०० रुपये, तर जिल्ह्यातील गहू २४७५ ते २६०० रु. क्विंटलने खरेदी करावा लागत आहे. गुजरातमधील गहू मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने त्याची आवक नाही. म.प्र.मधील शरबती गहू येण्यास आणखी दहा दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

ज्वारीच्या भावात तीन वर्षातील उच्चांकयंदा ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने भावात मागील तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. दगडी, मालदांडी ज्वारी ३००० रु. ते ३८०० रुपये क्विंटल विकत आहे.

काली मूँछ, बासमती बजेटबाहेरकाली मूँछ व बासमतीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काली मूँछ क्विंटलमागे एक हजार रुपयांनी महागून ४००० ते ५३०० रुपयांपर्यंत भाव आहेत. शुद्ध बासमती ५००० ते १२,००० रु. आहे. याची निर्यात होत असल्याने मागील पाच वर्षातील भाववाढीचा विक्रम मोडीत निघाला आहे.

मठ डाळीत भाववाढीचा विक्रमयंदा राजस्थानात मठाचे उत्पादन घटले आहे. परिणामी, मठ डाळीतील भाववाढीने मागील पाच वर्षाचा विक्रम मोडला आहे. एरव्ही ७० ते ७५ रु. किलोने विक्री होणारी मठ डाळ ११४ ते १२० रु. विकत आहे.

वार्षिक धान्य खरेदीसाठी योग्य काळधान्य खरेदी केल्यानंतर त्यास एकदा कडक उन्हात वाळवावे लागते. म्हणजे धान्यास कीड लागत नाही. सध्या तापमान वाढलेले आहे. धान्याचे भाव आणखी वाढतील. यामुळे सध्या धान्य खरेदीसाठी योग्य काळ आहे.- नीलेश सोमाणी, होलसेल, व्यापारी

गव्हाच्या किमतीप्रकार भाव (प्रतिक्विंटल)स्थानिक गहू २४७५ ते २६०० रु.मध्य प्रदेश गहू २६०० ते ३१०० रु.प्युअर शरबती ४२०० ते ४५०० रु.गुजरात गहू २७०० ते २८०० रु.ज्वारी ३००० ते ३८०० रु.

डाळीच्या किमतीतूर डाळ ८६०० ते ९३०० रु.मठ डाळ ११,४०० ते १२,००० रु.हरभरा डाळ ६००० ते ६५०० रु.उडीद डाळ ८९०० ते ९५०० रु.मूग डाळ ९००० ते ९८०० रु.

तांदळाच्या किमतीसुगंधी चिन्नोर ३४०० ते ३६०० रु.काली मूँछ ४००० ते ५३०० रु.कोलम ४८०० ते ५१०० रु.अंबेमोहर ६५०० ते ७६०० रु.बासमती ५००० ते १२,००० रु.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादInflationमहागाईShoppingखरेदी