शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:23 IST

सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देहॅट्ट्रिक, ज्येष्ठता की सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे देणार मंत्रीपदे

औरंगाबाद : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर सत्ता महायुतीचीच स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी महायुतीचे अजून काही ठरलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून निवडून आलेल्या महायुतीच्या शिलेदारांपैकी कुणाचा क्रमांक मंत्रीमंडळात लागणार याबाबत, सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त चर्चाच सुरू आहेत. 

शिवसेनेच्या वाट्याला मंत्रीपद आले तर ते सहापैकी कुणाला देणार आणि भाजपच्या वाट्याला मंत्रिपद आले तर तिघांपैकी कुणाला देणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षातील सर्व इच्छुक मुंबईला रवाना झाले आहेत. 

सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तार यांनी विजय मिळविल्यामुळे पहिल्यांदाच तेथे सेनेचा विजय झाला आहे. शिवाय सेना सत्तार यांच्याकडे भविष्यातील साबीर शेख म्हणत पाहत असेल तर  त्यांच्या नावाचा विचार करू शकते. पैठणचे आ. संदीपान भुमरे हे शिवसेनेत सध्या सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार पक्षाने केला नाही तर ते व त्यांचे समर्थक नाराज होतील. कन्नड आणि वैजापूरचे आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी काहीही संधी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. औरंगाबाद मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणारे आ. संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेवर निवडून गेलेले आ. अंबादास दानवे यांचाही शिवसेनेकडून विचार होणे शक्य आहे; परंतु दानवे यांचीही या पदावर निवडून जाण्याची पहिलीच वेळ आहे; परंतु पक्षीय पातळीवर अनेक बाबींचा विचार केल्यानंतर मंत्रिमंडळातील समावेशाबाबत निर्णय होईल.

भाजपकडून कुणाला संधीभाजपच्या वाट्याला आलेल्या तीन मतदारसंघांपैकी औरंगाबाद पूर्वमधून आ. अतुल सावे हे मागच्या वेळी उद्योग राज्यमंत्री होते. नवीन सरकार स्थापनेत त्यांना बढती मिळते की, तेच खाते त्यांच्याकडे कायम राहते याबाबत अजून काही स्पष्टता नाही. विधानसभा अध्यक्षपदी फुलंब्रीतून निवडून आलेले आ. हरिभाऊ बागडे हेच कायम राहतील, असे बोलले जात आहे. गंगापूरमधून आ. प्रशांत बंब यांनीही हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी भाजप श्रेष्ठी त्यांचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान शिवसेनेचे जैस्वाल यांचा बायोडाटा शिवसेना भवन येथून मागविण्यात आला आहे, जैस्वाल सध्या मुंबईत आहेत. तर आ.भूमरे यांना देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची अपेक्षा आहे. आ.शिरसाट यांनी आपल्या परीने पक्षातील काही नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. परंतु इच्छुकांच्या इच्छा तेव्हाच पुर्ण होतील, जेव्हा महायुतीचे सरकार होण्यासाठी वाटाघाटी होतील. 

तीन सूत्रांचा विचार होणे शक्यपक्षातील ज्येष्ठतेनुसार भाजपमधून बागडे आणि सेनेचे भुमरे यांची नावे आहेत. हॅट्ट्रिक करण्यात आ. बंब आणि आ. शिरसाट यांची नावे आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा विचार केला, तर आ. सत्तार यांचे नावे पुढे येते. ज्येष्ठता, हॅट्ट्रिक, सोशल इंजिनिअरिंगच्या या सूत्रानुसार सरकार स्थापनेनंतर जिल्ह्यात एखादे कॅबिनेट आणि एखादे राज्यमंत्री पद मिळेल, अशी चर्चा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ministerमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र