शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१३५ दिवसात मनपा निवडणूक कशी घेणार? अद्याप नवीन प्रभाग आराखडाही निश्चित नाही 

By मुजीब देवणीकर | Updated: September 19, 2025 20:06 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आयोग आणि राज्य सरकार संकटात सापडले आहे. पुढील १३५ दिवसांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा घेणार हा ‘सर्वोच्च’ प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही मागील ५ वर्षांपासून महापालिकेची निवडणूक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ४ महिन्यांत महापालिकेची निवडणूक होईल का? यावर अधिकाऱ्यांकडूनच साशंकता व्यक्त केली जात आहे.

२० एप्रिल २०२० पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत लोकप्रतिनिधी यावेत, असे मनापासून तर अजिबात वाटत नाही. निवडणुका घोषित होताच शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले बहुतांश अधिकारी महापालिका सोडून निघून जाण्याची दाट शक्यता आहे. कारण लोकप्रतिनिधींचा ‘सामना’हे अधिकारी करूच शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले. या आदेशानंतरही प्रशासनाकडून कोणतीही लगबग सुरू झालेली नाही. प्रारूप प्रभाग आराखडा घोषित झाला. त्यावर नियमांनुसार सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर आराखड्यातील त्रुटी दूर करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सुधारित आराखडा मनपा शासनाला सादर करेल.

ओबीसी विरुद्ध मराठासध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे राजकारण पेटलेले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेतल्या तर नुकसान होऊ शकते अशी सत्ताधारी महायुती सरकारला शंका येत आहे. त्यामुळे पुढील १३५ दिवसांत निवडणूका होतील किंवा नाही, यावर राजकीय मंडळींकडूनही साशंकता व्यक्त केली जात आहे.

‘सर्वोच्च’ आदेश कोणते?प्रभाग रचना तसेच आरक्षण टाकण्याची कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी पूर्ण करावी, निवडणुकांसाठी आवश्यक ईव्हीएम मशीन ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी उपलब्ध करून घ्याव्यात, त्याचा अनुपालन अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

निवडणूक न घेण्यासाठीची कारणेराज्य निवडणूक आयोगाकडे पुरेसा अधिकारी वर्ग उपलब्ध नाही; ईव्हीएम मशीन नाहीत; केवळ ६५००० ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षा व सणासुदीचे दिवस आहेत. मतदार यादी अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भात याचिका प्रलंबित आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर