लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डावॉर्डात धोकादायक मॅनहोल बंद करण्यासाठी वॉर्ड अधिकारी, अभियंत्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच कामे मार्गी लागतील, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील धोकादायक नाल्या, ड्रेनेजच्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका अजूनही याप्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी सर्व अधिकाºयांना शहरातील धोकादायक मॅनहोल बंद करण्याचे आदेश दिले. ज्याठिकाणी दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेला तेथीलही नाली, मॅनहोल बंद करण्यात आले नाही. शहरातील एकही धोकादायक मॅनहोल बंद करण्यात आल नाही. उलट शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, काही वसाहतींमध्ये तीन ते चार किलोमीटर लांब नाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ढापे, लोखंडी जाळी टाकणे अशक्यप्राय आहे. प्रत्येक वसाहतीत असा प्रयोग केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपये लागतील. जुनाबाजार येथील नाला कायमस्वरुपी महापालिकेने बंद केला. नाला बंद करता येऊ शकतो तर नाली का नाही... यावर सारवासारव करीत घोडेले यांनी नमूद केले की, ही कामे करण्यात येणार आहेत. तूर्त दुर्घटना घडू नये म्हणून बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जयभवानीनगरचे काय करणार?जयभवानीनगर येथे महापालिकेने तब्बल १५० घरांसमोर नाला खोदून ठेवला आहे. या नाल्यात भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश प्रशासनाने दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. शहरात आणखी मोठा पाऊस झाल्यास या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आजही या १५० घरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेला नाल्यावर स्लॅब टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या गंभीर विषयाकडे प्रशासन, पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.अहवाल १५ दिवसांनंतरजयभवानीनगर येथील नाल्यात बुडून भगवान मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तास होण्यापूर्वीच सिडको एन-६ येथे चेतन चोपडे यांचा मृत्यू झाला. या घटनांची सविस्तर चौैकशी करावी, असा आदेश सर्वसाधारण सभेत २० जून रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आला. मागील नऊ दिवसांमध्ये मनपाने कोणतीच चौैकशी सुरू केली नाही. गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी.पी. कुलकर्णी यांच्याकडे चौैकशी सोपविली. चौैकशीचा कालावधी १५ दिवस ठेवण्यात आला आहे.
औरंगाबादेतील ३ किलोमीटर लांब गटार बंद करणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:15 IST
शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
औरंगाबादेतील ३ किलोमीटर लांब गटार बंद करणार कसे?
ठळक मुद्देप्रश्न : आयुक्तांच्या आदेशानंतरही धोकादायक मॅनहोल उघडेच