शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालये, गेम झोन किती सुरक्षित? दरवर्षी आगीच्या ४५० ते ५०० घटना

By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2024 19:58 IST

महापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्रमुख अग्निशमन अधिकारी पाच वर्षांपासून मिळत नाही.

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत बाल रुग्णालयाला आग लागल्याने ७ नवजात बालकांचा रविवारी मृत्यू झाला. शनिवारी गुजरातच्या राजकोटमध्ये एका गेमिंग झोनला आग लागल्याने २७ जणांचा कोळसा झाला. आगीच्या या घटना सर्वसामान्यांना सुन्न करणाऱ्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालये, गेमिंग झोन किती सुरक्षित आहेत? महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून नियमित तपासणीही केली जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १८ लाख लोकसंख्येच्या शहरातील अग्निशमन विभागाला कायमस्वरूपी आणि जबाबदार प्रमुखही नाही.

शहरात दरवर्षी ४५० ते ५०० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडतात. यातील सर्वाधिक घटना घर, दुकाने, गोडाऊन, इलेक्ट्रिक डीपी आणि वाहनांना असतात. २०२३-२४ मध्ये मनपाच्या अग्निशमन विभागाकडे ४४९ कॉल आले. त्यातील एक कॉल रुग्णालयाचाही होता. शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविली आहे किंवा नाही? बसविली असेल तर त्याची नियमित चाचणी घेतली जाते का? आग लागल्याची एखादी घटना घडली तर संबंधित उपकरणे काम करतात का? याची तपासणी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आहे. महापालिका कधीच अशा पद्धतीची तपासणी करीत नाही. खासगी एजन्सीधारकांनी आणून दिलेले तपासणी प्रमाणपत्र ग्राह्य धरून संबंधित प्रतिष्ठानाची नोंदणी केली जाते.

शहरातील रुग्णालये किती सुरक्षित आहेत, आग लागली तर रुग्ण नातेवाइकांना पर्यायी रस्ते आहेत का? विविध मॉलसह अनेक ठिकाणी गेमिंग झोन आहेत. त्यांची तपासणी मनपाकडून होत नाही. शहरातही गुजरात आणि दिल्लीसारखी घटना महापालिकेला अपेक्षित आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

पूर्णवेळ अधिकारी नाहीमहापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्रमुख अग्निशमन अधिकारी पाच वर्षांपासून मिळत नाही. सेवानिवृत्त अधिकाऱ्यालाच वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. ६५ वर्षांनंतर निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवरही घेता येत नाही. हा शासनाचाच नियम आहे. त्यानंतरही एकाच निवृत्त अधिकाऱ्याला ६५ वर्षे उलटल्यानंतरही मुदतवाढ देण्याच्या हालचाली मनपातील काही अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत.

आता तपासणी होणारशहरातील सर्व खासगी रुग्णालये, महापालिकेचे आरोग्य केंद्र, रुग्णालये आणि गेमिंग झोनची तपासणी करण्याचे निर्देश आजच देण्यात आले आहेत. मनपा रुग्णालयांपासून आम्ही सुरुवात करतोय. जिथे आग रोखण्यासाठी यंत्रणा नाही, तेथे अगोदर बसवण्यात येईल. त्यानंतर खासगी रुग्णालयांची तपासणी हाेईल.- अंकुश पांढरे, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका