शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हौसेला मोल नसते! छत्रपती संभाजीनगरात ७०० भावांना बांधली चांदीची; २०० जणांना सोन्याची राखी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 8, 2023 18:21 IST

मागील वर्षापेक्षा २ टक्क्यांनी यंदा चांदी-सोन्याच्या राख्यांची विक्री वाढली.

छत्रपती संभाजीनगर : बहीण - भावातील अतूट स्नेहाचे प्रतीक असलेला ‘राखी पौर्णिमा’ सण काही दिवसापूर्वी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ताई - दादा’मधील हा स्नेह पैशात मोजता येत नाही किंवा कोणी तसा प्रयत्नही करू नये. मात्र, जेव्हा सराफा बाजारात या सणानिमित्त किती सोन्याच्या व किती चांदीच्या राखी विक्री झाल्या, हे विचारले असता प्राथमिक अंदाजानुसार शहरात चांदीच्या ७०० आणि सोन्याच्या २०० राख्या विक्री झाल्या. तेवढ्याच पटीने भाऊरायाचीही ओवाळणीची जबाबदारी वाढली. तसेही हौसेला मोल नसते, असे म्हटले जाते, याची राखी पौर्णिमेच्या निमित्ताने नव्याने प्रचिती आली.

सोने - चांदीचे भावराखीपौर्णिमा(३० ऑगस्ट)सोने--- ६०,४५० रु. (१० ग्रॅम)चांदी---७६,६०० रु. (प्रतिकिलो)

(६ सप्टेंबर)सोने--- ६०,५०० (१० ग्रॅम)चांदी्--- ७५,००० रु. (प्रतिकिलो)

चांदीची राखी ३५० रुपयांपासूनराखी पौर्णिमेला चांदीच्या राख्यांचे आकर्षण जास्त होते. शहरात चांदीच्या १,५०० राख्या विक्री झाल्या. यांची किंमत ३५० ते १,२०० रुपये प्रतिनग होती. यात १ ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंतच्या राख्यांचा समावेश होता.

सोन्याची राखी ४ हजारांपासूनचांदीच्या तुलनेत सोन्याची राखी खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी शहरात सोन्याच्या २०० राख्या विक्री झाल्या आहेत. यात अर्धा ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंत वजनाच्या राख्या ४ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत विकल्या गेल्या.

राजकोटची चांदी, तर स्थानिक सोन्याच्या राख्याराजकोट येथून बहुतांश चांदीच्या राख्या मागविण्यात आल्या होत्या. सोन्याच्या राख्या स्थानिक सुवर्णकारांनी तयार केल्या होत्या. चांदीच्या राख्यांमध्ये असंख्य प्रकार असल्याने या राख्यांना यंदा मागणी होती.

मागील वर्षीपेक्षा जास्त राख्यांची विक्रीदरवर्षी चांदी व सोन्याच्या राख्या खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चांदी व सोन्याची राखी बांधून जास्त प्रेम व्यक्त केले जाते, असे नाही. पण, माझ्या भावाला मी चांदीची किंवा सोन्याची राखी बांधते तेवढा तो अनमोल आहे. अशी भावना बहिणींची यामागील होती. यामुळे मागील वर्षापेक्षा २ टक्क्यांनी यंदा चांदी-सोन्याच्या राख्यांची विक्री वाढली.- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा असोसिएशन

चांदीचे भाव १,१०० रुपयांनी घसरलेराखी पौर्णिमेनंतर मागील ७ दिवसात चांदीचे भाव किलोमागे १,१०० रुपयांनी उतरले. आज चांदी ७५,५०० रुपये किलोने विकत आहे. राखी पौर्णिमेला ७६,६०० रुपये भाव होता. सोन्याच्या भावात १०० रुपयांची चढ-उतार झाली.-नंदकुमार जालनावाला, व्यापारी

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबादGoldसोनंSilverचांदी