शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच गॅस सिलिंडरसाठी तुम्ही जास्तीचे किती पैसे मोजता ? कोणी खुशीने तर कोणी...

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 29, 2024 15:47 IST

डिलिव्हरी बॉय मागतात जास्तीची रक्कम

छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जाहीर होते तेव्हा त्यात घरपोच सिलिंडर पोहोचविण्याची रक्कम घेतली जाते. यामुळे डिलिव्हरी बॉयला जास्तीची रक्कम देण्याची गरज नाही. कारण, कोणतीही अतिरिक्त रक्कम न देता गॅस एजन्सीने घरपोच सिलिंडर द्यावे, असे आदेश सरकारचे व गॅस कंपन्यांचे आहेत. मात्र, असे असताना शहरात काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून जास्तीच्या रकमेची मागणी करतात. त्यासाठी अनेक वेळा ग्राहकांशी वादही घालतात. कोणी वाद नको म्हणून जास्त रक्कम देतात किंवा काही जण खुशीनेही ‘टिप’ देतात.

२९ रुपये जास्तीचे घेतातसध्या घरगुती सिलिंडरचे दर ९११.५० रुपये आहेत. मात्र, काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून १०३० ते १०४० रुपये घेतात. म्हणजे सिलिंडरमागे १९ ते २९ रुपयांपर्यंत जास्त रक्कम ग्राहकांना द्यावी लागते.

३.२६ रुपयांची सबसिडीकेंद्र सरकार प्रत्येक सिलिंडरच्या मागे सबसिडी देत असते. आजघडीला प्रत्येक सिलिंडरमागे ३.२६ रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.

तक्रार कोठे कराल ?डिलिव्हरी बॉय सिलिंडरच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम मागत असेल तर त्याची तक्रार संबंधित गॅस एजन्सीकडे करावी. कारवाई नाही झाली तर संबंधित गॅस कंपनीकडे किंवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.

म्हणून आम्ही देतो जास्तीचे पैसेआम्ही रो हाऊसमध्ये राहतो. तरी पण डिलिव्हरी बॉय सिलिंडरच्या किमतीपेक्षा जास्तीची रक्कम मागतात. वरील रक्कम दिली नाही तर पुढील वेळीस सिलिंडर उशिरा आणून देईल, या भीतीने आम्ही जास्तीचे पैसे देतो.- वनिता मोरे, गृहिणी, बीड बायपास

अनेकदा होतात वादजाहीर झालेल्या किमतीप्रमाणेच पावती दिली जाते. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त रक्कम डिलिव्हरी बॉयला द्यावी लागते. यासाठी अनेकदा वादही झाले. आम्ही वरच्या मजल्यावर सिलिंडर आणून देतो, त्यामुळे जास्त पैसे घेतो, असे डिलिव्हरी बॉय सांगतात.- सायली जोशी,गृहिणी, गारखेडा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद